AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वर्षांपासून अन्न गिळू शकत नव्हती मुलगी.. डॉक्टरांनी एकही चिरा न लावता केली तिच्यावर विशेष ‘एंडोस्कोपिक’ प्रक्रिया!

अचलेशिया कार्डिया: मुलीला अचलेशिया कार्डिया आजार होता. त्यामुऴे तीन वर्षापासून ती अन्न गिळू शकत नव्हती. देशातील सर्वात कमी वजनाच्या आणि वयाच्या मुलीवर POEM नावाच्या ‘एंडोस्कोपिक प्रक्रिये’ द्वारे उपचार करण्यात आल्याचा दावा डॉक्टरांनी या प्रकरणात केला आहे. जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण.

तीन वर्षांपासून अन्न गिळू शकत नव्हती मुलगी.. डॉक्टरांनी एकही चिरा न लावता केली तिच्यावर विशेष ‘एंडोस्कोपिक’ प्रक्रिया!
| Updated on: Jul 22, 2022 | 3:43 PM
Share

मुंबईः अलीकडेच एक 6 वर्षांची मुलगी उपचारासाठी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात पोहोचली, तिला जवळपास 3 वर्षांपासून अन्न गिळता येत नव्हते. तिल वारंवार उलट्यांचा त्रास होत होता. जेवण झाल्यावर लगेचच तोंडातून व नाकातून उलट्या (Vomiting from the nose) होत होत्या. यामुळे मुलीला खूप त्रास होत होता आणि तिचे वजनही सतत कमी होत होते. मुलगी 6 वर्षांची होती आणि तिचे वजन फक्त 11 किलो होते. डॉक्टरांनी तपासणी (Inspection) केली असता मुलीला ‘एकलाझिया कार्डिया’ (Achalasia cardia) नावाचा आजार असल्याचे आढळले, ज्यामध्ये अन्न गिळले जात नाही. त्याच्यावर विशेष ‘एंडोस्कोपिक’ पद्धतीने उपचार करण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि पॅनक्रियाटोबिलरी सायन्सेस, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्लीचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. अनिल अरोरा म्हणाले की, जेव्हा मुलगी उपचारासाठी त्यांच्याकडे आली तेव्हा ती खूप बारीक, अशक्त होती. तिचे वजन तिच्या वयाच्या सामान्य वजनापेक्षा 8-10 किलो कमी होते.

कसे केले उपचार

मुलीवर एन्डोस्कोपी नंतर हाय रिझोल्यूशन एसोफेजॅलमॅनोमेट्री करण्यात आली, ज्यामध्ये ती मुलगी अचलेशिया कार्डिया (अन्न गिळण्याची विकृती) ग्रस्त असल्याचे उघड झाले. अशा लहान मुलांमध्ये अचलेशिया कार्डियाचा उपचार शस्त्रक्रियेद्वारे केला जातो, परंतु त्या तुलनेत आम्ही या मुलीमध्ये एंडोस्कोपिक प्रक्रिया (POEM) – प्रति ओरेलेंडोस्कोपिक मायोटॉमी करण्याचा निर्णय घेतला. POEM च्या मदतीने मुलीची बंद असलेली फीडिंग ट्यूब उघडण्यात आली.

सर्वात मोठे आव्हान

डॉ. अरोरा म्हणाले की, ६ वर्षे आणि ११ किलो वजनाच्या या सर्वात लहान आणि कमी वजनाच्या मुलीवर एंडोस्कोपिक प्रक्रिया करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. अशा कमकुवत आणि कमी वजनाच्या मुलीला संसर्ग आणि श्वसनाच्या समस्यांचा सर्वाधिक धोका होता. लहान मुलामध्ये POEM प्रक्रियेत वापरलेली प्रौढ एंडोस्कोपिक आणि सहाय्यक उपकरणे वापरणे हे अत्यंत कठीण काम होते.

हा आजार दुर्मिळ आहे

सर गंगाराम हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग सल्लागार डॉ. शिवम खरे यांच्या मते, या प्रक्रियेचे चार स्तर आहेत. प्रथम अन्न नलिकेचे आतील अस्तर कापून, स्नायूचे थर आणि अन्न नलिकेचे आतील अस्तर यांच्यामध्ये मार्ग तयार करणे, नंतर पोट आणि अन्न नलिकेच्या जंक्शनवर जटिल स्नायू कापणे आणि शेवटी हेमोक्लिप्ससह आतील थर बंद करणे. लहान मुलांमध्ये अचलेशिया कार्डिया होण्याची शक्यता कमी असते आणि 5% पेक्षा कमी अचलेशिया कार्डियाचे रुग्ण हे 15 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. ही ‘स्पेशल एंडोस्कोपिक प्रक्रिया (POEM)’ करण्यासाठी दीड तास लागला आणि प्रक्रियेनंतर रुग्णाला अन्ननलिका आणि पोटाच्या जंक्शनमधील ब्लॉकेजपासून त्वरित आराम मिळाला.

एकही चिरा न लावता केली शस्त्रक्रिया

पर ओरल एंडोस्कोपिक मायोटॉमी ही एन्डोस्कोपिक प्रक्रिया आहे ज्याचा वापर अचलसिया कार्डियावर उपचार करण्यासाठी केला जातो, अन्न नलिकेच्या खालच्या भागात अडथळा येतो. POEM ही एक नवीन एंडोस्कोपिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये ती छाती किंवा पोटावर कोणत्याही चीराशिवाय एंडोस्कोपद्वारे केली जाते. यामध्ये रुग्णाला एक ते दोन दिवस रुग्णालयात दाखल करावे लागते. डॉ. अरोरा म्हणाले की, अत्याधुनिक प्रगत निदान प्रक्रिया आणि हाय-डेफिनिशन एंडोस्कोपच्या मदतीने कोलेंजिया कार्डियासारख्या आजारांवर सहज उपचार करता येतात. आतापर्यंत रुग्णालयात 427 रुग्णांवर ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे, मात्र भारतात प्रथमच सर गंगाराम रुग्णालयात केवळ 11 किलो वजनाच्या 6 वर्षाच्या मुलावर ही प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.