AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE 10th Results 2022 : मयांक यादव देशात अव्वल, 100 पैकी 100 टक्के पटकावले; दहावीचा निकाल 94.40 टक्के

दीर्घ कालावधीनंतर आणि प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये एकूण 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त, निकाल डिजिलॉकरवरदेखील तपासला जाऊ शकतो.

CBSE 10th Results 2022 : मयांक यादव देशात अव्वल, 100 पैकी 100 टक्के पटकावले; दहावीचा निकाल 94.40 टक्के
| Updated on: Jul 22, 2022 | 3:27 PM
Share

मुंबईः सीबीएसई (Central Board of Secondary Education) बोर्डाकडून आज दहावीच्या दुसऱ्या सत्राचा अंतिम निकाल (Result) जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी 2022 मध्ये एकूण 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसईचा निकाल प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हा जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल तुम्ही सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवरह पाहू शकता. या परीक्षेत मयांक यादवने (Mayank Yadav) देशात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याला 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले असून यावर्षीचा दहावीचा निकाल 94.40 टक्के इतका लागला आहे.

परीक्षेच्या निकालाची लिंक

मागील वर्षांप्रमाणेच यावर्षीप्रमाणेही CBSE परीक्षेच्या निकालाची लिंक (DigiLocker) ॲप आणि वेबसाइट digilocker.gov.in वर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. CBSE बोर्ड परीक्षेच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रे आणि स्थलांतर प्रमाणपत्रे देखील डिजिलॉकरद्वारे देण्यात येणार आहेत.

डिजिलॉकर ॲपवर असा पाहा निकाल

डिजिलॉकर ॲपवर दहावीचा निकाल कसा तपासायचा ते जाणून घेण्यासाठी पुढील गोष्टींचा आधार घ्या; स्टेप 1: विद्यार्थी स्मार्ट फोनमधील Digilocker.gov.in या वेबसाइटवर जाऊ शकतात किंवा Play Store वर जाऊन Digilocker ॲप डाउनलोड करू शकतात.

डिजिलॉकर ॲपवर 10 वीचा निकाल तपासायचा कसा ते जाणून घ्या

स्टेप 1: विद्यार्थी स्मार्ट फोनमधील Digilocker.gov.in या वेबसाइटवर जाऊ शकतात किंवा Play Store वर जाऊन Digilocker अॅप डाउनलोड करू शकतात.

स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, साइन अप लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: तुमचे नाव (जे आधार कार्डवरील प्रमाणे), जन्मतारीख, श्रेणी, वैध मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि 6 अंकी Sequirty पिन प्रविष्ट करा. स्टेप 4: सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर, यूजरनेम सेट करा. स्टेप 5: अकाऊंट तयार केल्यानंतर, ‘CBSE Class 10 Result 2022’ या लिंकवर क्लिक करा. स्टेप 6: तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. स्टेप 7: ते तपासल्यानंतर आणि डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही प्रिंटआउट घेऊ शकता आणि ते तुमच्याकडे ठेवू शकता.

तुम्ही CBSE निकाल कुठे पाहू शकता

CBSE ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in यावर दहावीचा निकाल जाहीर केला आहे. मंडळाने नुकतेच ‘परीक्षा संगम’ पोर्टल सुरू केले आहे. विद्यार्थी CBSE 10 वीचा निकाल त्याच्या अधिकृत पोर्टल parikshasangam.cbse.gov.in वर देखील पाहू आणि डाउनलोड करू घेऊ शकतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.