AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदा वाचाच! भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे

भोपळ्याचे दाणे सहसा खीर, लाडू अशा अनेक गोड पदार्थांमध्ये टाकून खाल्ले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी भोपळ्याचे दाणे खाण्याचे फायदे घेऊन आलो आहोत.

एकदा वाचाच! भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे
Pumpkin seedsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 12, 2023 | 5:42 PM
Share

भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन के, फॉस्फरस, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, झिंक, लोह, कॉपर, व्हिटॅमिन बी 2 आणि पोटॅशियम सारख्या गुणधर्मांचा साठा आहे. त्यामुळे भोपळ्याचे दाणे सहसा खीर, लाडू अशा अनेक गोड पदार्थांमध्ये टाकून खाल्ले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी भोपळ्याचे दाणे खाण्याचे फायदे घेऊन आलो आहोत. भोपळ्याच्या बिया मधुमेह नियंत्रणापासून हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात, तर चला जाणून घेऊया भोपळ्याचे बिया खाण्याचे फायदे.

भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे

रक्तातील साखर नियंत्रित करते

भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडेंट्स असतात जे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात. अशा वेळी मधुमेहाचे रुग्ण भोपळ्याचे दाणे स्नॅक म्हणून खाऊ शकतात.

मन निरोगी ठेवते

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण चांगले असते, जे आपल्या मेंदूसाठी उत्कृष्ट मानले जाते. त्यामुळे भोपळ्याच्या बियाण्याचे सेवन केल्याने मेंदूचे कार्य सुधारते, तसेच शरीरातील अनेक अवयवांना फायदा होतो.

हृदय निरोगी ठेवते

भोपळ्याच्या बिया निरोगी चरबी आणि फायबर सारख्या बऱ्याच अँटी-ऑक्सिडेंट्सने समृद्ध असतात, जे आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात. त्याचबरोबर भोपळ्याच्या बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड देखील आढळतात, जे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी असतात.

सांधेदुखीपासून आराम

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने संधिवात म्हणजेच सांधेदुखीपासून मुक्ती मिळते. अशावेळी भोपळ्याच्या बियाच्या तेलाने सांध्यांना मसाज करा.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी