Health : कॅन्सरपासून वाचायंच असेल तर स्वयंपाक घरातील ही भांडी आताच बाहेर काढून टाका
तुम्ही स्वयंपाकघरात वापरत असलेल्या गोष्टींपासून कर्करोगाचा धोका वाढतो. तर आता आपण स्वयंपाक घरातील अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्या तातडीनं काढून टाकल्या पाहीजेत, जेणेकरून कर्करोगाचा धोका निर्माण होणार नाही.

मुंबई : प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर आरोग्य नीट ठेवायचे असेल तर आपण वापरत असलेल्या वस्तू देखील स्वच्छ आहेत का हे तपासणं गरजेचं आहे. यामध्ये मग तुमची स्वयंपाक करण्याची पद्धत आणि तुम्ही अन्न कोणत्या भांड्यात खाता या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण आजकाल स्वयंपाक करताना वापरल्या जाणाऱ्या भांड्यांमध्ये मोठा बदल होत आहे. पूर्वी मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवले जायचे. यामुळे आपले आरोग्य निरोगी राहायचे. पण आता प्लास्टिक, अॅल्युमिनियम अशा भांड्यांचा वापर केला जातो. याचा आपल्या शरीरावर परिणाम होताना दिसतो. अशा भांड्यांमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. होय तुम्ही ऐकताय ते खरं आहे.
प्लास्टिक – आजकाल प्लास्टिकच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मग लोक स्वयंपाकघरात पाण्याची बॉटल, ताट-वाटी, टिफिन अशा अनेक गोष्टींचा वापर करताना दिसतात. पण याच प्लास्टिकच्या वस्तूंचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. जर तुम्ही प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न ठेवत असाल तर यामुळे विषारी पदार्श इंसुलिन वाढवतात. यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू वापरणं टाळा.
नॉन स्टिक भांडी – बहुतेक लोक स्वयंपाकघरात नॉन स्टिक भांड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात. पण हीच भांडी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरतात. नॉन स्टिक भांडी वापरल्यामुळे तुम्हाला कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. नॉन स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवताना त्यातील पीएफसी कोटिंवर परिणाम करतात. तेच अन्नाद्वारे आपल्या पोटात जाते आणि कर्करोगाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नॉन स्टिक भांडी वापरू नका.
अॅल्युमिनियमची भांडी – आजकाल स्वयंपाकघरात अॅल्युमिनियमची भांडी लोकं वापरताना दिसतात. पण हीच भांडी तुमच्यासाठी घातक ठरतात. कारण अॅल्युमिनियमच्या भांड्यातील अॅल्युमिनियम हळूहळू संपत जातो आणि तो अन्नाद्वारे आपल्या शरीरात पोहोचतो, त्यामुळे आपल्या शरीरात विष पसरते. तर अॅल्युमिनियमचे कण हे आपल्या शरीरात जमा झाल्यानंतर कर्करोगाचा धोका निर्माण होता. तसंच अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये तुम्ही अन्न बनवत असाल तर त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होता.
अॅल्युमिनियम फॉइल – बहुतेक लोक अन्न जास्तवेळ गरम राहण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करतात. पण हेच अॅल्युमिनियम फॉइल तुमच्यासाठी हानिकारक ठरते. कारण अॅल्युमिनियम फॉइलमध्ये असलेले अॅल्युमिनियम अन्नाद्वारे आपल्या पोटात जाते. ते पोटात गेल्यामुळे आपल्या शरीराला झिंक नीट शोषूण घेता येत नाही. त्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करू नका.