AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सरच्या गाठीमध्ये वेदना होतात का? तज्ज्ञांनी सांगितली आहेत ही लक्षणे, तुम्हालाही आढळली तर सावधान!

अनेकदा शरीरावरील एखादी गाठ ही कॅन्सरची आहे की सामान्य हे लक्षात येत नाही. तसेच कन्सरच्या गाठीत वेदना होतात का की नाही आणि त्यावरून कॅन्सरची गाठ नक्की कसं ओळखावी? तज्ज्ञांनी काय सांगून ठेवलं आहे. ते जाणून घेऊयात.

कॅन्सरच्या गाठीमध्ये वेदना होतात का? तज्ज्ञांनी सांगितली आहेत ही लक्षणे, तुम्हालाही आढळली तर सावधान!
Are cancerous tumors painful or not?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2025 | 7:47 PM
Share

कॅन्सर म्हटलं की भल्याभल्यांचे खच्चीकरण होते. गेल्या 10 वर्षांत तर कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. महिलांमध्येही कॅन्सरचे प्रमाण आता वाढताना दिसत आहे. स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर हा महिलांमध्ये सर्वात सामान्य कॅन्सर आहे. कॅन्सर हा सर्वात धोकादायक आजार मानला जातो. जर तो वेळेवर समजला नाही तर जगणे कठीण होते. या प्राणघातक आजारापासून वाचण्यासाठी सर्वांनाच खूप सतर्क राहण्याची गरज आहे. निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची गरज आहे. तसेच, शरीरात कोणत्याही प्रकारचा बदल दिसला तर तो ताबडतोब डॉक्टरांना दाखवावा. कधीकधी शरीरात अशा गाठी तयार होतात की आपल्याला त्या सामान्य वाटतात आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काही लोकांचा असा विश्वास आहे की जर गाठींमध्ये वेदना होत नसतील तर ती सामान्य आहे. पण कॅन्सरच्या गाठीत वेदना होते की नाही? आणि ती गाठ कॅन्सरचीच आहे हे कशावरून ओळखावं. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते पाहुयात.

कॅन्सरच्या गाठीमध्ये वेदना असतात का?

बऱ्याच वेळा शरीरात अशा गाठी तयार होतात ज्यात वेदना जानवतात. तर काही गाठी वेदनारहित असतात. डॉक्टरांच्या मते, कोणत्याही गाठीकडे दुर्लक्ष करू नये. अनेक डॉक्टरांनी असे सांगितले आहे की सुरुवातीला कॅन्सरच्या गाठीमध्ये वेदना होणे आवश्यक नाही. बऱ्याच वेळा जेव्हा ही गाठी लहान आकाराची असते तेव्हा त्या वेदनारहित असतात. परंतु जेव्हा गाठींचा आकार वाढतो आणि गाठी त्यांच्या सभोवतालच्या संरचनेत पसरतात तेव्हा वेदना जाणवू शकतात. याशिवाय, बायोप्सीनंतर कॅन्सरच्या गाठींमध्ये वेदना होऊ शकतात. किंवा संसर्ग असला तरीही, कॅन्सरच्या गाठींमध्ये वेदना जाणवू शकतात.

ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

तज्ज्ञांच्या मते कधीकधी गाठीमध्ये सौम्य वेदना होतात आणि कधीकधी अजिबात वेदना होत नाहीत. गाठीतून द्रव किंवा रक्त बाहेर पडल्यास ते धोकादायक ठरू शकते. शरीरात कुठेही गाठ असल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.

कॅन्सरची मुख्य लक्षणे

भूक न लागणे आणि वजन लवकर कमी होणे ही कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे आहेत.

सतत खोकला आणि रक्तस्त्राव होणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.

आवाजात बदल होणे हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

जर पोटात तीव्र वेदना होत असतील किंवा कावीळ होत असेल तर ते देखील कॅन्सरचे लक्षण आहे.

अचानक शरीरावर अनेक चामखीळ येणे हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.

कोणत्याही वेदनाशिवाय लघवीतून रक्त येणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.

अन्न खाण्यात अडचण येणे, मसालेदार किंवा गरम अन्न खाण्यात अडचण येणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.

त्यामुळे गाठ जाणवली तर त्यात वेदना होतेय की नाही यावरून अंदाज लावण्यापेक्षा थेट डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे कधीही चांगले.

(डिस्क्लेमर: ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही आजाराशी संबंधित उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.