Health | नाश्त्याच्या वेळी या 4 चुका करणे टाळा आणि रक्तातील साखरेची समस्या नियंत्रणात ठेवा…

उच्च रक्तातील साखर असलेल्या रुग्णांसाठी नाश्ता न करणे धोकादायक ठरू शकते. मर्यादित प्रमाणात सेवन करणे हानिकारक नाही. नाश्त्यामध्ये फायबरची कमतरता - फायबरयुक्त पदार्थ नाश्त्यामध्ये टाळू नयेत. फायबरयुक्त पदार्थ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात.

Health | नाश्त्याच्या वेळी या 4 चुका करणे टाळा आणि रक्तातील साखरेची समस्या नियंत्रणात ठेवा...
| Edited By: | Updated on: Aug 17, 2022 | 6:20 AM

मुंबई : बऱ्याचकाळ उच्च रक्तातील साखरेमुळे अनेक गंभीर समस्या (Problem) उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत सकस आहार आणि उत्तम जीवनशैली असणे अत्यंत आवश्यक आहे. उच्च रक्तातील साखरेच्या रुग्णांनी नाश्ता करतानाही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जर या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले तर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे या लोकांना साखरेचा त्रास (Trouble) आहे, अशांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खातो हे देखील अत्यंत महत्वाचे (important) आहे.

नाश्ता करणे टाळणे आरोग्यासाठी धोकादायक

बरेच लोक वजन कमी करण्याच्या चक्करमध्ये सकाळी नाश्ता करणे टाळतात. मात्र, असे करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. सकाळचा नाश्ता वगळू नये. मधुमेही रुग्णांसाठी हे अत्यंत घातक ठरू शकते. एका अभ्यासानुसार, मधुमेहाने त्रस्त लोक जे नाश्ता करत नाहीत, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे मधुमेही रूग्णांनी नाश्ता करणे आवश्यक आहे.

प्रोटीनचे सेवन अधिक करणे फायदेशीर

संशोधनानुसार, प्रोटीनचे सेवन केल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. उच्च प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. तुम्ही नाश्त्यात बीन्स, मसूर आणि ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तसेच प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने वजनही कमी होण्यास मदत होते.

नाश्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर घ्या

उच्च रक्तातील साखर असलेल्या रुग्णांसाठी नाश्ता न करणे धोकादायक ठरू शकते. मर्यादित प्रमाणात सेवन करणे हानिकारक नाही. नाश्त्यामध्ये फायबरची कमतरता – फायबरयुक्त पदार्थ नाश्त्यामध्ये टाळू नयेत. फायबरयुक्त पदार्थ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. म्हणूनच नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. याने आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे होतात.