AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर पिणे का आहे फायदेशीर? एकदा नक्की वाचा!

उन्हाळी सिसन ड्रींक्स, उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आरोग्यदायी टिप्स, चिया सीड्स वॉटर , शरीरासाठी चिया बियांचे फायदे, काही ताजेतवाने आणि निरोगी उन्हाळ्यातील ड्रींक्स, हेल्दी टिप्स, डेली हेल्दी टिप्स, 6 ताजेतवाने उन्हाळ्यातील ड्रींक्स, भारतातील उन्हाळ्यासाठी आरोग्यदायी ड्रींक्स

उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर पिणे का आहे फायदेशीर? एकदा नक्की वाचा!
| Edited By: | Updated on: Mar 05, 2025 | 3:40 PM
Share

उन्हाळा सुरू होताच शरीरातील उष्णता वाढते, थकवा जाणवतो व सतत पाण्याची कमतरता भासते. त्याच बरोबर उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या आणि पचनासंबंधी त्रास होऊ लागतो. आशा वेळी खुप पाणी पिणे आणि लाइट खाणे योग्य असते. त्ततच हे काळे छोटे चिया सीड्स तुम्हाला उन्हाळ्यात खुप फायदेशीर ठरतील.

उन्हाळ्यातील सुपरफूड पैकी एक सुपरफूड म्हणजे चिया सीड्स वॉटर. वाढत्या उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर हे शरीरासाठी एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी ड्रींक ठरू शकत. चिया सीड्समध्ये ओमेगा-3, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात, जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतात आणि उष्णतेपासून संरक्षण करतात. चला जाणून घेऊया की उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर का आणि कसे प्यावे.

उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटरचे फायदे

१. शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतो-

उन्हाळ्यात गरमीमुळे व शरीरातील चिप – चिप मुळे जास्त घाम येतो, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास उद्भभवतात. चिया सीड्स पाण्यात काही तास भिजवल्यावर जेलसारखे होतात आणि हे पोटात जाऊन शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

२. उष्णतेपासून संरक्षण करते-

चिया सीड्समध्ये थंड प्रभाव असतो. उन्हाळ्यात ते नियमित प्यायल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि उष्णतेपासून संरक्षण होते.

3. उर्जा वाढवते-

उन्हाळ्यात खुप प्रमाणात थकवा आणि कमजोरी जाणवते. चिया सीड्समध्ये असलेले जिवनसत्व शरीराला ऊर्जा देतात, ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते.

४. वजन नियंत्रणात रहोते-

चिया सीड्स वॅाटरने पचन मंदावते, ज्यामुळे पोट भरलेले राहते व वारंवार भूख लागत नाही. हे वजन नियंत्रणात ठवण्यास मदत करते.

५. हाडांची मजबूती बनवणे-

चिया सीड्समध्ये खुप प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम असतात, जे हाडांसाठी उपयुक्त असतात. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातून मिनरल्स बाहेर टाकले जातात, दररोज ‘हे’ पेय प्यायल्याने हाड बळकट होण्यास मदत होते.

६. पचनशक्ती वाढवते-

सतत गरम आणि हेवी फुड खाल्याने अनेकांना अपचन, अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. चिया सीड्समध्ये फायबर असते, जे पचनसंस्था सुधारवण्यास मदत करते.

असे बनवा चिया सीड्स वॉटर

१. एका ग्लास पाण्यात 1 चमचा चिया सीड्स घाला.

२. चिया सीड्सना पाण्यात 10-15 मिनिटे भिजू द्या (चिया सीड्स जेल सारखे होऊ लागतील)

३. मग ते चांगले ढवळून घ्या (हवअसल्यास त्यात लिंबाचा रस किंवा मध मिसळा)

४. दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी दिवसातून २वेळा हे प्यावे.

उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटरप्रमाणेच हे काही इतर ड्रींक्सही नक्की ठरतील फायदेशीर

१. साबजा वॉटर – चिया सीड्सप्रमाणेच साबजा वॉटर देखील उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास मदत करेल. हे वॉटर शरीर डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते.

२. कोकम सरबत – कोकम हे थंड फळ आहे. कोकम सरबत उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते

३.तरबूज वॉटर – तरबूज हे ही एक थंड फळ आहे. याच्या रसात साखर असते त्यामुळे हे शरीराला हायड्रेटेड ठेऊन जीभेला नैसर्गिक गोडसर चव मिळवून देते.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.