AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tomato Juice : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते वजन घटवण्यापर्यंत… आरोग्यासाठी फायदेशीर टोमॅटो ज्यूस

टोमॅटोचा वापर साधारणत: अनेक पदार्थांमध्ये केला जातो. टोमॅटोची भाजी, सार, सूप, चटणी, त्याशिवाय भेळ, उतप्पा, टोमॅटो ऑम्लेट असे अनेक पदार्थ यापासून बनवले जातात. अतिशय स्वादिष्ट असलेला टोमॅटो हा शरीरासाठीही खूप फायदेशीर असतो.

Tomato Juice : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते वजन घटवण्यापर्यंत... आरोग्यासाठी फायदेशीर टोमॅटो ज्यूस
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Aug 03, 2022 | 11:43 AM
Share

मुंबई : भारतात आणि जगात इतरत्रही स्वयंपाकघरात टोमॅटोचा (Tomato) वापर सढळरित्या केला जातो. टोमॅटोची भाजी, सार, सूप, चटणी असतेच, त्याशिवाय पावभाजी , भेळ, उतप्पा, टोमॅटो ऑम्लेट, पिझ्झा, बर्गर या पदार्थांमध्येही टोमॅटोला महत्व आहे. टोमॅटोमुळे पदार्थाची केवळ चवच वाढत नाही तर तो आपल्या शरीरासाठीही तितकाच फायदेशीर असतो. त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), व्हिटॅमिन ए (Vitamin A), फायबर (Fiber), फोलेट आणि कॅल्शिअमसारखी (Calcium) पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. सॅलॅडमधूनही आपण टोमॅटोचे सेवन करू शकतो. त्याशिवाय टोमॅटोचा ज्यूस नियमितपणे प्यायल्यास ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हा ज्यूस प्यायल्याने आपल्या तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया टोमॅटोच्या सेवनाचे फायदे…

डोळ्यांसाठी फायदेशीर

वर नमूद केल्याप्रमाणे टोमॅटोच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. ते आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने दृष्टी चांगली होते. डोळे निरोगी व स्वस्थ राहण्यासाठी टोमॅटोचा ज्यूस नियमितपणे प्यावा.

मधुमेह

टोमॅटोच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅरोटिन, व्हिटॅमिन ई, फोलेट आणि फ्लेवोनाइड सारखी अनेक पोषक तत्वं असतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

टोमॅटोच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तसेच त्यामध्ये लायकोपीन व बीटा-कॅरोटीन सारखी पोषक तत्वेही असतात. हे सर्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे टोमॅटोच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुम्ही कमी आजारी पडता.

वजन कम करण्यास मदत करते

टोमॅटोच्या ज्यूसमध्ये फायबर असते. हा ज्यूस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. त्याचे नियमितपणे सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.

बॅड कॉलेस्ट्रॉल कमी होते

टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे त्रासला असाल तर रोज एक ग्लास टोमॅटोचा ज्यूस नक्की प्या.

डिटॉक्सीफाय

टोमॅटोचा ज्यूस हा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याचे काम करतो. त्याचे रोज सेवन केल्यास किडनी आणि यकृताचे कार्य सुधारण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

टोमॅटोमध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. टोमॅटोमध्ये लायकोपीन, बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन – सी सारखी पोषक तत्वे असतात. जी हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करतात.

टीप : या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?