AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits of lemon water : दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 5 आश्चर्यकारक फायदे !

Benefits of lemon water : लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज सकाळी एक ग्लास लिंबू पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेऊया रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे फायदे.

Benefits of lemon water : दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील 5 आश्चर्यकारक फायदे !
लिंबू पाणी Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 11, 2022 | 3:12 PM
Share

एक ग्लास लिंबूपाणी उन्हापासून आराम देण्याचे काम करते. रोज सकाळी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. लिंबू कोणत्याही पदार्थाची चव त्याच्या आंबटपणाने वाढवते. लिंबू केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर, आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि खनिजे (Vitamins and minerals) असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे फळ तुम्हाला कोणत्याही ऋतूत मिळेल. लिंबू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Very beneficial) मानले जाते. लिंबू व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. लिंबूमध्ये थायामिन, नियासिन (Thiamin, Niacin), रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ई आणि फोलेट सारखी जीवनसत्त्वे असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. आयुर्वेदातही लिंबू खूप फायदेशीर मानले जाते.

नैराश्य आणि यकृतासाठी फायदेशीर

लिंबूपाणीच्या सेवनाने लठ्ठपणाच्या समस्येवर मात करता येते. लिंबू रक्तदाब, नैराश्य आणि यकृतासाठी खूप चांगले आहे. एवढेच नाही तर लिंबू पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करता येते. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक विषाणूजन्य संसर्गापासून वाचवण्यास मदत करू शकते.

वजन कमी करण्यास मदत करते

अनेकदा सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे पचनाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता आणि सूज इत्यादीपासून आराम देते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्याने चयापचय गतिमान होते. त्यामुळे पोटाची चरबी कमी होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

चमकदार त्वचेसाठी

लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करते. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने त्वचा सुधारते. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. चमकदार त्वचेसाठी तुम्ही दररोज लिंबू पाण्याचे सेवन करू शकता.

जळजळ प्रतिबंधित करते

लिंबाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामध्ये पोटॅशियम, फोलेट, फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. हे गुणधर्म जळजळ होण्यापासून संरक्षण करण्यासाठी कार्य करतात.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

लिंबू एस्कॉर्बिक ऍसिडचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे नैसर्गिक पद्धतीने प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. व्हिटॅमिन सी फ्लू आणि सर्दीपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे अनेक प्रकारच्या व्हायरस आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी काम करते.

ऊर्जादायक पेय

दिवसभर एनर्जी लेव्हल राखण्यासाठी तुम्ही लिंबूपाण्याचे सेवन करू शकता. तुम्ही नॉन-अल्कोहोल ड्रिंक्सऐवजी लिंबूपाणी घेऊ शकता. हे स्वादिष्ट असण्यासोबतच हेल्दी देखील आहे. इतर साखरयुक्त पेयांचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.