मधुमेहाच्या रूग्णांसाठी ‘या’ झाडाच्या पानांचा चमचाभर रस ठरेल फायदेशीर
Peepal Juice Benefits: सनातन धर्मात पिंपळाचे विशेष महत्त्व आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का पिंपळाचे झाड औषधी गुणधर्मांनीही परिपूर्ण आहे. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, पिंपळाची साल आणि पानांचा वापर केल्यामुळे तुमच्या आरोग्याला खासकर तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. चला तर जाणून घेऊया पिंपळाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे.

हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अत्यंत खास मानले जाते. पिंपळाच्या झाडाला भारतीय संस्कृती, धर्म आणि आयुर्वेदात विशेष महत्त्व दिले जाते. भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली असल्यामुळे त्याला बोधीवृक्ष असे देखील म्हणतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? पिंपळाच्या झाडामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदामध्ये, पिंपळाच्या झाडाबद्दल अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहे. आयुर्वेदिकानुसार, पिंपळाचे झाड हे असे झाड आहे ज्यामुळे मणुष्याला 24 तास ऑक्सिजन मिळते त्यासोबतच हे वातावरणातील हवा शुद्ध करते. या झाडाची मुळे खोलवर पसरलेली आहेत, ज्यामु मातीला ताकद मिळते.
धार्मिक तज्ज्ञांच्या मते, हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्यामुळे, त्याची पूजा केल्याने आणि त्याखाली ध्यान केल्याने तुमच्या शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते. भगवद्गीतेमध्ये त्याला अश्वत्थ वृक्ष म्हटले आहे. त्याची साल, पाने आणि फळे अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जातात. दमा, मधुमेह आणि हृदयरोगांच्या उपचारांमध्ये हे उपयुक्त मानले जाते.
पिंपळाच्या सालीचा आणि पानांचा काढा बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता यासारख्या पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करतो. हे पोटातील अल्सर आणि आतड्यांमधील जळजळ कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. पिंपळाच्या पानांचा रस एक्जिमा, डाग आणि खाज यासारख्या त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. पिंपळाच्या पानांची साल बारीक करून लावल्याने जखमा आणि पिंपल्स बरे होतात. याशिवाय, पिंपळाच्या पानांचा काढा दमा, खोकला आणि ब्राँकायटिस सारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यास मदत करतो. पिंपळाच्या पानांचा रस तुमच्या फुफ्फुसांना ताकद देण्यासाठी आणि श्वसनसंस्था साफ करण्यास उपयुक्त ठरतात. पिंपळाची साल आणि पानांचा वापर हृदयरोग रोखण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी केला जातो. पिंपळाच्या पानांचा रस तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते. पिंपळाचा रस मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतो. त्याच्ा सालीचा आणि पानांचा अर्क रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. पिंपळाच्या पानांचा आणि सालीचा लेप सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतो. पिंपळाचा शरीरावर संधिवाताची लक्षणे कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. पिंपळाच्या पानांचा काढा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
पिंपळाबद्दल काही खास गोष्टी
- पिंपळाचे झाड भारतात आणि हिंदू धर्मात पवित्र मानले जाते.
- पिंपळाच्या झाडला ज्ञान आणि शांतीचे प्रतीक मानले जाते.
- पिंपळाचे झाड दीर्घायुष्य, शहाणपण आणि संरक्षणाचे प्रतीक आहे.
- पिंपळाच्या झाडाला दिव्य वृक्ष सुद्धा म्हणतात.
