AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळजी घ्या, तीव्र सूर्यप्रकाशामुळे होऊ शकतो त्वचेचा कर्करोग; गोऱ्या लोकांना अधिक धोका… जाणून घ्या, काय आहेत लक्षणे !

प्रखर सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणे आपल्या आरोग्यासाठी खुप हानीकारक होऊ शकते. तीव्र सूर्यप्रकाश तुम्हाला त्वचेचा कर्करोग देखील देऊ शकतो, त्यापासून स्वतःचे संरक्षण करा. कर्करोगाची लक्षणे वेळेवर ओळखणे महत्वाचे आहे.

काळजी घ्या, तीव्र सूर्यप्रकाशामुळे होऊ शकतो त्वचेचा कर्करोग; गोऱ्या लोकांना अधिक धोका... जाणून घ्या, काय आहेत लक्षणे  !
काळजी घ्या, तीव्र सूर्यप्रकाशामुळे होऊ शकतो त्वचेचा कर्करोगImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 29, 2022 | 10:07 PM
Share

सध्या देशभरात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. कडक सूर्यप्रकाश (Sunlight) आणि उष्णते (Heat)मुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे हिट स्ट्रोक, डिहायड्रेशन सारखे आजार होतात. परंतु, तीव्र सूर्यप्रकाशामुळे आपल्याला त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो. या कर्करोगाला मेलेनोमा त्वचा कर्करोग म्हणतात. जे अवयव थेट सूर्याच्या तीव्र किरणांच्या संपर्कात येतात त्या, अवयवांमध्ये त्वचेचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे कर्करोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे असते. सूर्यप्रकाश आपल्या शरीरासाठी चांगला असतो. परंतु सकाळी 7 ते 9 या वेळेत सूर्यप्रकाशाचे सेवन केले पाहिजे. यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी ही मिळेल आणि सूर्याच्या तीव्र किरणांपासूनही तुमचे संरक्षण होईल. जर ते खूप आवश्यक असेल. त्यानंतरच कडक उन्हात बाहेर जा आणि या काळात संपूर्ण शरीर झाकून बाहेर जा.

काय म्हणातात तज्ज्ञ ?

राजीव गांधी कर्करोग संशोधन संस्थेतील, ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विनीत तलवार यांच्या मते, शरीरातील पेशींच्या असामान्य वाढीमुळे कर्करोग होतो. सूर्याच्या किरणांमधून निघणाऱ्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे (U.V Rays) त्वचेचा कर्करोग होतो. याशिवाय कौटुंबिक इतिहास, कमी प्रतिकारशक्ती आणि रेडिएशनमुळेही कर्करोग होण्याची शक्यता असते. इतर देशांच्या तुलनेत भारतात त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण कमी असले, तरी सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

गोऱ्या लोकांना अधिक धोका

तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ उन्हात राहिल्यास त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. विशेषत: चेहरा, मान आणि हातांना कर्करोगाचा धोका असतो. सावळ्या लोकांपेक्षा गोऱ्या लोकांना त्वचेचा कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. कारण गोऱ्या लोकांच्या शरीरात मेलेनिन कमी असते. हे मेलेनिन त्वचेच्या कर्करोगापासून संरक्षण करते. गोरा लोकांमध्ये ते कमी असल्याने त्यांना त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

काय आहेत लक्षणे ?

शरीरावर चामखीळ येणे त्वचेवर पांढरे डाग दिसणे त्वचेवर उघड्या जखमा मानेवर लाल चट्टे तयार होणे त्वचेत काही बदल दिसू लागणे

Follow Us
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...