17 वर्षांच्या तरुणाच्या जबड्यात ट्यूमर, डॉक्टरांनी तोंडातून 82 दात बाहेर काढले

बिहारमध्ये एका मुलाच्या जबड्याच्या ट्यूमरवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी या मुलाच्या तोंडातून 82 दात काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

17 वर्षांच्या तरुणाच्या जबड्यात ट्यूमर, डॉक्टरांनी तोंडातून 82 दात बाहेर काढले
Bihar complicated Tumor in jaw operation
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 9:38 AM

नवी दिल्ली : दात हा मानवी शरीराचा एक अवयव आहे. सर्वसामान्यपणे माणसाच्या जबड्यात 32 दात असतात. मात्र बिहारमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बिहारमध्ये एका मुलाच्या जबड्याच्या ट्यूमरवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी या मुलाच्या तोंडातून 82 दात काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Bihar 17 year old boy complicated Tumor in jaw operation remove 82 teeth)

नितीशकुमार असे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात राहतो. गेल्या पाच वर्षांपासून ते जबड्याच्या ट्यूमरने त्रस्त आहेत. नितीश हे यांचे वय केवळ 17 वर्षे आहे. नितीश याने जबड्याच्या ट्यूमरवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. यानंतर ते आयजीआयएमएस रुग्णालयात उपचारासाठी आले होते.

जबड्यात छोटे छोटे 82 दात

नितीश हे रुग्णालयात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी ते जबड्यातील ट्यूमरच्या समस्येने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली. यावेळी रुग्णालयातील डॉ. प्रियंकर सिंह आणि डॉ जावेद यांनी त्यांच्या टीमने ट्यूमरवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी ट्यूमरमध्ये जवळपास छोटे छोटे 82 दात होते, ते शस्त्रक्रिया करत काढण्यात आले.

‘या’ कारणामुळे होऊ शकतो ट्यूमर

डॉ. प्रियंकर आणि डॉ. जावेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशच्या जबड्यावर पार पडलेली ही शस्त्रक्रिया फार गुंतागुंतीची होती. जबड्यातील ट्यूमरवर करण्यात येणारी शस्त्रक्रिया ही फार क्वचित केली जाते. ट्यूमरची समस्या सहसा जबड्यात आढळत नाही, परंतु कधीकधी अनुवांशिक कारणामुळे किंवा दुखापतीमुळे जबडे आणि दात तयार होण्याच्या प्रक्रियेत त्रास होतो आणि हळूहळू ते ट्यूमरचे रूप घेते.

(Bihar 17 year old boy complicated Tumor in jaw operation remove 82 teeth)

संबंधित बातम्या : 

कड्डक बातमी! कडकनाथ कोंबडी खाल्ल्याने कोरोना रुग्णांची इम्युनिटी पॉवर वाढेल; रिसर्च सेंटरचे ICMRला पत्रं