कड्डक बातमी! कडकनाथ कोंबडी खाल्ल्याने कोरोना रुग्णांची इम्युनिटी पॉवर वाढेल; रिसर्च सेंटरचे ICMRला पत्रं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 09, 2021 | 7:49 PM

कोरोना रुग्णांसाठी एक कड्डक बातमी आहे. कडकनाथ कोंबडी खाल्ल्याने कोरोना रुग्णांची इम्युनिटी पॉवर वाढू शकते, असं मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्राला वाटतंय. (Kadaknath Chicken will increase covid patients immunity)

कड्डक बातमी! कडकनाथ कोंबडी खाल्ल्याने कोरोना रुग्णांची इम्युनिटी पॉवर वाढेल; रिसर्च सेंटरचे ICMRला पत्रं
Kadaknath

झाबुआ: कोरोना रुग्णांसाठी एक कड्डक बातमी आहे. कडकनाथ कोंबडी खाल्ल्याने कोरोना रुग्णांची इम्युनिटी पॉवर वाढू शकते, असं मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्राला वाटतंय. त्यामुळेच या दोन्ही विभागाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला (DHR) पत्रं लिहून तसं कळवलं आहे. त्यामुळे आयसीएमआर आणि डीएसचआर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Kadaknath Chicken will increase covid patients immunity)

कडकनाथ कोंबड्याच्या मांसामध्ये हाय प्रोटीन, व्हिटॅमिन, झिंक आणि लो फॅट असतात. तसेच त्या कोलेस्ट्रोल फ्रि सुद्धा आहेत. अशावेळी या कोंबड्या पोस्ट कोविड आणि कोविडच्या काळात डाएट प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारक शक्ती वाढेल, असं कृषी विज्ञान केंद्र आणि झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटरने म्हटलं आहे.

पुरावे जोडले

या चिठ्ठीसोबत नॅशनल मीट रिसर्च सेंटर आणि मेडिकल जर्नलमधील प्रकाशित रिपोर्टच्या प्रतीही जोडण्यात आल्या आहेत. तसेच ट्विटरवरही सूचना पत्रं दिलं आहे. तसेच दोन्ही संस्थांनी चिठ्ठी आणि कागदपत्रे आयसीएमआर आणि डीएचआरला पाठवली आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि कडकनाथ रिसर्च सेंटरने आयसीएमआरला काही सूचनाही केल्या आहेत. कडकनाथ केंद्राच्या संचालकाने हे सूचना पत्रं आणि पुरावे आयसीएमआरला पाठवले आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

डाएटमध्ये समावेश करा

कडकनाथ कोंबड्याचा आणि अंड्यांचा कोविड रुग्णांच्या डाएटमध्ये समावेश करायचा की नाही हे आता आयसीएमआरवर अवलंबून आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यावर कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांवर या कडकनाथ कोंबड्यांचा किती परिणाम होतो, हे त्याच्या प्राथमिक परीक्षणानंतरच दिसून येऊ शकतं. जर हे परिणाम सकारात्मक असतील तर त्याचा डाएटमध्ये समावेश केला जाऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं.

कोलेस्ट्रोल आणि फॅट फ्री

कडकनाथ कोंबड्यांमध्ये शरीरात ताकद निर्माण करणारे सर्व तत्त्व असल्याचा दावा आधीपासूनच केला जात आहे. या कोंबड्यांमध्ये कोलेस्ट्रोल आणि फॅट सारखे तत्त्व नाहीत. त्याबाबत हैदराबाद नॅशनल मीट रिसर्च लॅबोरेटरीने आधीच स्पष्ट केलं आहे. कोविड रुग्णांची प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी कोणते तत्व आवश्यक आहेत, त्यावर आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये एक लेखही प्रकाशित झालेला आहे. त्यामुळेच कडकनात कोंबड्यांचा पोस्ट कोविड आणि कोविड रुग्णांच्या डाएटमध्ये समावेश करण्याची मागणी जोर धरत आहे. (Kadaknath Chicken will increase covid patients immunity)

संबंधित बातम्या:

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, कोरोनाबळी मात्र वाढले

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, अ‍ॅक्टिव्ह केसेसही वाढल्या

(Kadaknath Chicken will increase covid patients immunity)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI