AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर 7 व्या मिनिटाला यमाचे दूत दारी…महिलांमध्ये झपाट्याने बळावतोय हा आजार, लक्षण काय, उपाय माहिती आहे का?

तज्ज्ञांच्या मते, या आजाराने देशात महिलांचे जगणं मुश्किल केलं आहे. दर 7 मिनिटाला कुणाची तरी आई, बहीण,पत्नी,मावशी आपल्यातून हिरावली जात आहे. काय आहे कारण? काय आहेत या रोगाची लक्षणं?

दर 7 व्या मिनिटाला यमाचे दूत दारी...महिलांमध्ये झपाट्याने बळावतोय हा आजार, लक्षण काय, उपाय माहिती आहे का?
महिलांचा गंभीर आजार
| Updated on: Aug 23, 2025 | 3:44 PM
Share

देशातील स्त्रीयांवर नवीन संकट आलं आहे. देशात दर 7 मिनिटाला एक महिलेचा या आजारामुळे मृत्यू होत आहे. हा मृत्यूचा फेरा आई,बहीण,पत्नी अथवा नातेवाईक महिलेला आपल्यातून हिरावून नेत आहे. भारतात गर्भाशयाचा मुख कर्करोग (cervical cancer) झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जगात भारतात या रोगाचे 25 टक्के रुग्ण आहेत. सर्वाईकल कॅन्सर हा महिलामध्ये होणारा एक आजार आहे. गर्भाशयाच्या मुखात हा आजार होतो. आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.रुचिका गर्ग यांनी याविषयीची माहिती दिली. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या (HPV) संसर्गामुळे हा आजार पसरतो. या आजारापासून वाचण्यासाठी लस सुद्धा बाजारात दाखल झाली आहे. काय आहेत या आजाराची लक्षण आणि उपाय जाणून घेऊयात…

डॉ.गर्ग यांच्या दाव्यानुसार, प्रत्येक 7 मिनिटाला एक महिलेचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू होत आहे. या रोगामुळे प्रत्येक वर्षी एक लाखाहून अधिक महिलांचा मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण जगात भारतात या रोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या चुकांमुळे वाढला कॅन्सरचा धोका

तर हा आजार व्ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या संसर्गामुळे वाढला आहे. तर काही प्रमाणात मानवी चुका सुद्धा त्याला कारणीभूत आहे. यामध्ये एकापेक्षा अधिक लोकांशी शरीरसंबंध अथवा कमी वयात लैंगिक संबंध ही सुद्धा कारणं समोर आली आहेत. पण व्ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा धोका वाढल्याने हा आजार बळावत चालला आहे.

काय आहे उपाय?

डॉ. गर्ग यांच्या मते, या आजारापासून वाचण्यासाठी आता बाजारात लस दाखल झाली आहे. कमी वयाच्या मुलींना ही लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना या व्हायरसचा संसर्ग होणार नाही. लसीसंबंधी काही मार्गदर्शक सूचना पण समोर आल्या आहेत. त्यानुसार, 9 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना ही लस द्यायला हवी. 26 वर्षांपर्यंतच्या महिलांना सुद्धा लस देता येऊ शकते. तर 40 नंतरच्या महिलांनी ही लस घेतली नसेल तर त्यांना पण लस घेता येते. 45 वर्षांपर्यंतच्या महिलांना लस घेता येऊ शकते. हा आजार झाला की नाही हे तपासण्यासाठी एचपीव्हीची चाचणी करता येते. किपपनिकोलाऊची तपासणी करून या आजाराचे निदान होते. आता या आजारावर बाजारात लस उपलब्ध झाली आहे. ही व्हॅक्सीन सरकारी रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याविषयीची चर्चा सुरू असल्याचे समजते.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा