त्या एका चुकीमुळे पुरुषांची ‘कसोटी’; स्टाईलच्या नादात मोठे नुकसान, अंडरवेअर विषयी तज्ज्ञांचा तो सल्ला अजिबात विसरू नका
Tight Underwear : पुरुषांची ही चूक संपूर्ण कुटुंबाला वेढ्यात आणू शकते. पुरुषांच्या आरोग्यासाठी असे प्रकार घातक ठरतात. त्याचा परिणाम विवाह संस्थेवर होतो. काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ?

Side Effects of Tight Underwear : सध्याचे युग हे फॅशन आणि स्टाईलचे आहे. अनेक पुरुष स्टाईलच्या नावाखाली टाईट अंडरवेअर घालतात. पण ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, टाईट अंडरविअर घातल्याने संसर्गाची भीती वाढली आहे. तर त्याचा पुरुषाच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. टाईट अंडरवेअर दिसायला आकर्षक वाटत असली तरी तिचे अनेक धोके आहेत. टाईट अंडरवेअरमुळे पुरुषांच्या अंडकोषाचे (testicles) तापमान वाढते. अंडकोष हे स्पर्म, शुक्राणू तयार करतात. त्यासाठी कमी तापमानाची गरज असते. जर अंडकोष दीर्घकाळ गरम असतील तर शुक्राणूची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही घसरते. दीर्घकाळ जर टाईट अंडरवेअर घालत असाल तर प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. तर घामामुळे या ठिकाणी जीवाणू होण्याचा धोका आणि त्वचा रोगाचा धोका पण बळावतो. उन्हाळ्यात ही समस्या वाढू शकते.
लैंगिक आरोग्यावर परिणाम
डॉक्टरांच्या मते, जे पुरुष सतत घट्ट अंतर्वस्त्र घालतात, त्यांच्या लैंगिक आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यांच्या रक्त प्रवाहात अडथळा येतो आणि सतत दबावामुळे पुरुषांच्या गुप्तांगाची संवदेनशीलता कमी होते. त्यामुळे पुरुषाची कामेच्छा आणि त्याची उत्तेजना प्रभावित होऊ शकते. टाईट अंडरवेअरचा पोट आणि मुत्राशयावर दबाव पडतो. अपचनाची समस्या वाढते. तर वारंवार लघवीला जाण्याची प्रवृत्ती बळावते. तसेच पोटात वेदना होण्याची भीती असते. टाईट अंडरवेअरमुळे ऊर दबल्याचे अनेकदा जाणवते.
सैल अंडरवेअर घाला
आरोग्य तज्ज्ञानुसार, पुरुषांनी सैल आणि आरामदायक अंडरवेअरचा वापर करणे आवश्यक आहे. कॉटन आणि मोकळ्या अंडरवेअर घातल्याने संवदेनशील भागावरील ताण कमी होतो. हवा खेळती राहत असल्याने अंडकोषाचे तापमान वाढत नाही. या भागात त्वचा रोग आणि खाजेचे प्रमाण नसते. बॉक्सर स्टाईल अंडरवेअर आरामदायक मानले जातात. त्यामुळे शरीराला कोणताही धोका, नुकसान होत नाही. परिणामी पुरुषांची प्रजनन क्षमता सुद्धा चांगली राहते. त्यामुळे स्टाईलिश अंडरवेअरपेक्षा आरामदायक आणि सैल अंडरवेअर खरेदी करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
(डिस्क्लेमर : विविध स्त्रोत्रांताआधारे ही माहिती दिलेली आहे. टीव्ही 9 यासंबंधी दावा करत नाही. अचूक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या)
