AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात रोज करा रताळ्याचे सेवन, आजार राहतील दूर

रताळ्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात रताळ्याचे सेवन आवर्जून करण्याचा सल्ला दिला जातो. रताळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वजन कमी करण्यासाठी देखील रताळे फायदेशीर ठरतात.

हिवाळ्यात रोज करा रताळ्याचे सेवन, आजार राहतील दूर
Sweet PotatoImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 24, 2024 | 12:54 PM
Share

रताळ्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रताळे हे फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. यामध्ये अँटिऑक्सिडंट देखील असतात. जे शरीराला मुक्त रॅडिकल्स मुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. ज्यामुळे जुनाट आजार होण्याची शक्यता कमी असते. यासोबतच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स बटाट्याच्या तुलनेत कमी असतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. जाणून घेऊया रताळ्याचे आरोग्याला होणारे फायदे.

हाडांसाठी फायदेशीर

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन डी आढळते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. हे जीवनसत्वे दात, हाडे, त्वचा आणि मज्जातंतूच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी आवश्यक आहे.

लोहाचा चांगला स्त्रोत

रताळ्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे ऊर्जा कमी राहते आणि त्याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत रताळ्याचे सेवन लोहाची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

रक्तातील साखर कमी करते

रताळ्यामध्ये कॅरोटीनॉइड नावाचे तत्व आढळते. जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन बी 6 हृदयरोगावरही फायदेशीर ठरू शकते.

किडनीसाठी फायदेशीर

रताळे पोटॅशियमचा चांगला स्त्रोत मानला जातो. जे तुमची मज्जासंस्था सुधारण्यास मदत करते. यासोबतच हे किडनी निरोगी ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

रताळ्यातील व्हिटॅमिन ए तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. एक रताळे तुमच्या शरीराला 102% व्हिटॅमिन ए पुरवते. रताळे आतड्यांचा स्तर देखील राखतो. जे हानिकारक रोगजनकांना आतड्यात जाण्यापासून प्रतिबंधक करते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

वजन कमी करण्यास मदत करते

उच्च फायबर सामग्री कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि मंद पचन यामुळे वजन कमी करण्यासाठी रताळे खाणे योग्य मानले जाते. रताळे वजन कमी करण्यास मदत करतात. रताळ्याचे सेवन केल्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे लवकर भूक लागत नाही. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी रताळे खाण्याचा सल्ला दिला जातो.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा