Corona Wave News | कोरोनाची लाट पुन्हा नियंत्रणाबाहेर? दिल्ली-गुजरात-बंगालमधील आकडे भीतीदायक

| Updated on: Jul 29, 2022 | 12:41 PM

Corona Wave News | गेल्या 24 तासांत, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक 2203 रुग्ण आहेत. कर्नाटकात 1889, 1837 मध्ये केरळमध्ये. तामिळनाडूत 1,712 तर पश्चिम बंगालमध्ये 1,495 रुग्ण आहेत. याशिवाय दिल्लीत गेल्या 24 तासात 1128 रुग्णांची नोंद झाली आहे.

Corona Wave News | कोरोनाची लाट पुन्हा नियंत्रणाबाहेर? दिल्ली-गुजरात-बंगालमधील आकडे  भीतीदायक
वाढता वाढता वाढे
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Corona Wave News | ही बातमी घाबरवण्यासाठी नाही तर अलर्ट (Alert) करण्यासाठी आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाची रुग्णसंख्या (Number of Corona Patient) झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. ही आकडेवारी दिसायला फार मोठी असली तरी कोरोनाचा संसर्गाचा वेग पाहता आणि त्याचा अनुभव पाहता ही आकडेवारी ही गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी (Public Places) वावर करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात (Countrywide) 20,409 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर या रुग्णांपैकी 32 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह केसेस (Active Cases) 1,43,988 वर गेल्या आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 2,335 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. दिल्ली, गुजरात, बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये दररोज 1000 हून अधिक कोरोना रुग्ण संख्या समोर येत आहे.

 

या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

गेल्या 24 तासांत, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक 2203 रुग्ण आहेत. त्यांनतर कर्नाटकात 1889, केरळमध्ये 1837, तामिळनाडूत 1712 आणि पश्चिम बंगालमध्ये 1495 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय दिल्लीत गेल्या 24 तासात 1128 रुग्णांची नोंद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

 
पश्चिम बंगाल- दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक

देशात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 5.12% वर पोहोचला आहे. पश्चिम बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10.42% झाला आहे. यापूर्वी बुधवारी तो 8.55% इतका होता. गेल्या 24 तासात कोरोनाचे 7 मृत्यूंची नोंद या प्रदेशात झाली. पश्चिम बंगालमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 19,143 झाली आहे.

दिल्लीत, गेल्या 24 तासांत येथे 1,128 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 1 महिन्यातील हा उच्चांक आहे. पॉझिटिव्हिटी रेटही वाढून तो 6.56% झाला आहे. परंतु, गेल्या 24 तासात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. दिल्लीत सलग 6 व्या दिवशी पॉझिटिव्हिटी रेट 5% च्या वर आहे. दिल्लीतील अॅक्टिव्ह केसेस 3,526 वर गेल्या आहेत. याआधी राजधानीत 15 जून रोजी कोरोनाचे 1,375 रुग्ण आढळले होते. तेव्हा पॉझिटिव्हिटी रेट 7.01% होता. बुधवारी दिल्लीत 1066 रुग्णांची नोंद करण्यात आली.

गुजरातमध्ये 5 महिन्यांनंतर 1000 हून अधिक प्रकरणे

गुरुवारी गुजरातमध्ये कोरोनाच्या 1101 रुग्णांची नोंद करण्यात आली. 5 महिन्यानंतर 1000 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत 12, 52,089 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात या जागतिक महामारीमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. याआधी गुजरातमध्ये 14 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 1040 रुग्ण आढळले होते. गेल्या 24 तासांत राज्यात 886 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रीय रुग्ण 5,995 आहेत. अहमदाबादमध्ये सर्वाधिक 374 रुग्ण आहेत.

1 जून रोजी देशात 4,372 रुग्ण आढळले होते.

1 जूनपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढलं आहे. 1 जून रोजी देशात 4,372 रुग्ण होते. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढले. गेल्या 15 दिवसांपासून देशात दररोज कोरोनाचे 15 ते 20 हजारांपर्यंत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे.