AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री की दिवसा? कधी चेहऱ्याला लावयचं व्हिटॅमिन सी सीरम, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

आजच्या धकाधकीत्या जीवनामुळे आणि सर्वत्र असलेल्या धुळीचा परिणाम त्वचेवर होतो... यामुळे अनेक महिला वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधने वापरतात... यामध्ये व्हिटॅमिन सी सीरम फार महत्त्वाची भूमिका बजावते. पण सीरम कधी लावयचं याबद्दल फार कोणाला माहिती नसतं. त्यामुळे जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

रात्री की दिवसा? कधी चेहऱ्याला लावयचं व्हिटॅमिन सी सीरम, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
| Updated on: Mar 30, 2026 | 3:54 PM
Share

त्वचा उजळ करण्यासाठी आणि काळे डाग घालवण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. अनेक लोक चेहरा उजळ करण्यासाठी आणि काळे डाग घालवण्यासाठी व्हिटॅमिन सी सीरम वापरतात. पण सत्य हे आहे की, ते केव्हा आणि कसे वापरावे हे बऱ्याच लोकांना समजत नाही. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्यास, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. व्हिटॅमिन सी एक उपयोगी अँटिऑक्सिडंट आहे. त्यामुळे, ते दिवसभर सूर्यप्रकाशातील किरणे, प्रदूषण आणि धुळीच्या कणांपासून त्वचेचे संरक्षण करते. म्हणूनच, व्हिटॅमिन सी सीरम सकाळी लावणे सर्वोत्तम आहे. पण सीरम लावल्यानंतर सनस्क्रीन वापरायला विसरू नका.

त्वचेच्या पेशींच्या पुनर्निर्मितीसाठी रात्री व्हिटॅमिन सी वापरणे चांगले असते. मात्र, जर तुम्ही रात्री इतर कोणतीही उत्पादने वापरत असाल, तर त्यांच्यासोबत व्हिटॅमिन सी वापरू नका. यामुळे त्वचेला जळजळ आणि कधीकधी मुरुमे येऊ शकतात. व्हिटॅमिन सी त्वचेचा टोन समतोल करतो आणि निस्तेजपणा दूर करून चमक आणतो

त्याचप्रमाणे, सीरम जास्त प्रमाणात लावू नका. चेहऱ्यावर सीरमचे फक्त २-३ थेंब हळुवारपणे लावा. चेहरा धुतल्यानंतर आणि कोरडा केल्यानंतरच सीरम लावा. सीरमच्या रंगाकडे लक्ष द्या. जर त्याचा रंग गडद नारंगी किंवा तपकिरी झाला, तर याचा अर्थ ते ऑक्सिडाइज झाले आहे. अशी उत्पादने वापरू नका.

वापरण्याची पद्धत: सर्वप्रथम, आपला चेहरा पूर्णपणे धुवा आणि आवश्यक असल्यास टोनर वापरा. ​​तसे न केल्यास, चेहरा व्यवस्थित कोरडा करा. त्यानंतर व्हिटॅमिन सी सीरम लावा. जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिटॅमिन सी सीरम वापरत असाल, तर कोणतीही ऍलर्जी नाही याची खात्री करण्यासाठी पॅच टेस्ट करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला कोणत्या त्वचेच्या समस्या असतील तर, कोणताही सीरम वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. एवढंच नाही तर, चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी लिंबू, संत्री, टोमॅटो आणि आवळा यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. आहार आणि व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

Follow Us
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात