Deltacron : आणखी एका नव्या वेरियंटची धास्ती, सायप्रसमध्ये डेल्टाक्रॉनचे 25 रुग्ण, ओमिक्रॉनसह डेल्टाशी कनेक्शन?

कोरोना विषाणूच्या डेल्टा वेरियंट आणि ओमिक्रॉन वेरिएंटच्या लक्षणांसारखा नवा वेरियंट समोर आला आहे. त्या वेरिएंटचं ना डेल्टाक्रॉन (Deltacron) निश्चित करण्यात आलं आहे.

Deltacron : आणखी एका नव्या वेरियंटची धास्ती, सायप्रसमध्ये डेल्टाक्रॉनचे  25 रुग्ण, ओमिक्रॉनसह डेल्टाशी कनेक्शन?
Deltacron
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 12:12 PM

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगावर कोरोनाच्या डेल्टा (Delta) आणि ओमिक्रॉन (Omicron)चं संकट सुरु आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये दररोज लाखो रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा वेरियंट आणि ओमिक्रॉन वेरिएंटच्या लक्षणांसारखा नवा वेरियंट समोर आला आहे. त्या वेरिएंटचं नाव  डेल्टाक्रॉन (Deltacron) निश्चित करण्यात आलं आहे. सायप्रस या देशात डेल्टाक्रॉन वेरियंटचे 25 रुग्ण आढळून आले आहेत.

सायप्रसच्या बायोटेक्नॉलॉजी अँड मॉलिक्रुयलर वायरोलॉजी विद्यीपठाच्या प्रयोगशाळेतील प्रमुख डॉक्टर लियोनडिओस कोस्रिकस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सायप्रसमध्ये आढळून आलेल्या 25 रुग्णांपैकी 11 जणांना या वेरिएंटमुळं रु्गणालयात दाखल करावं लागलं होतं.तर, 14 जणांची प्रकृती स्थिर होती. कोस्त्रिकस यांच्या मते रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांमधील म्युटेशनची फ्रीक्वेन्सी जादा होती.

डेल्टाक्रॉन वेरियंट नेमका काय?

सायप्रसमधील तज्ज्ञांच्या मते कोरोना विषाणूचा नवा वेरियंट डेल्टाक्रॉन हा वेगळा विषाणू नाही.तर, डेल्टा आणि ओमिक्रॉनचं मिळत जुळतं रुप आहे. मात्र, अद्याप जागतिग आरोग्य संघटनेनं याला परवानगी दिलेली नाही.

डेल्टाक्रॉनमध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टाची लक्षणं

डेल्टाक्रॉनमध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टा वेरियंटची लक्षण आढळूण आल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टासारखी लक्षणं आढळली असली तरी यासंदर्भात अजून अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही संघटनेनं डेल्टाक्रॉनला मंजुरी दिलेली नाही. डेल्टाक्रॉनला काही ठिकाणी डेल्मीक्रॉन देखील म्हटलं जातंय.

भारतात आज 1 लाख 79 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद

देशात गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 79 हजार 723 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 146 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 7 लाख 23 हजार 619 वर पोहोचली आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येचा पॉझिटीव्हीट दर 13.29 वर पोहोचला आहे.

इतर बातम्या:

corona cases India : कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख, पावणे दोन लाखांचा टप्पा पार, ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढली

Goa Election 22 : गोव्यात उत्पल पर्रिकरांना शिवसेना तिकीट देणार का? संजय राऊत म्हणतात, धाडसी निर्णय घ्यावे लागतात !

Deltacron new strain that combination of delta and omicron founded in cyprus yet not get approval from world level organizations

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.