Health : हिवाळ्याता मेथीची भाजी जास्त खात असाल तर सावधान ही बातमी एकदा वाचाच

होय तुम्ही ऐकताय ते खरं आहे. मेथी जास्त प्रमाणत खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. तर आता आपण जास्त प्रमाणात मेथी खाल्ल्यामुळे काय नुकसान होते याबाबत जाणून घेणार आहोत.

Health : हिवाळ्याता मेथीची भाजी जास्त खात असाल तर सावधान ही बातमी एकदा वाचाच
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 3:20 PM

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले असून थंडीच्या या दिवसांमध्ये बाजारात हिरवीगार मेथी पाहायला मिळते. त्यात बहुतेक लोकांना मेथी खायला भरपूर आवडते. मग थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोक मेथीपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. मग मेथीचे पराठे असो, मेथीची भाजी असो असे अनेक पदार्थ बनवत असतात. त्यात मेथी ही आपल्या शरीरासाठी गुणकारी असते. मेथीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमीन, प्रोटीन असे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे मेथी ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. मेथी खाल्ल्यामुळे अनेक शारीरिक समस्या नाहीशा होतात. पण तुम्हाला माहितीये का की, मेथी ही जास्त खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

अॅलर्जीची समस्या – बहुतेक लोकांना मेथीची अॅलर्जी असते. जर अशा लोकांनी मेथी जास्त प्रमाणात खाल्ली तर त्यांच्या त्वचेवर अॅलर्जी निर्माण होण्याची शक्यता असते. मग मेथीमुळे झालेल्या अॅलर्जीने आपल्या चेहऱ्यावर सूज निर्माण होते. तसंच बहुतेक लोकांचे शरीर देखील दुखायला लागते. त्यामुळे मेथी जास्त प्रमाणात खाऊ नये.

पचनक्रिया बिघडते – मेथीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे मेथी खाल्ल्यानंतर पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. पण जर जास्त प्रमाणात मेथी खाल्ली तर तुमचे पोट बिघडू शकते, गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जास्त प्रमाणात मेथी खाऊ नका. तसंच ज्यांची पाचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांनी जास्त प्रमाणत मेथी खाऊ नये.

उच्च रक्तदाब – मेथीमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मेथी जास्त खाल्ली तर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. तसंच ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी जास्त प्रमाणात मेथी खाऊ नये. नाहीतर त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

शुगर  लो होते – मेथी खाल्ल्यामुळे शुगर कमी होण्यास मदत होते. तसंच ज्यांना लो शुगरचा त्रास आहे अशांनी मेथीचे सेवन करू नये. कारण अशा लोकांनी जर मेथी जास्त प्रमाणात खाल्ली तर त्यांची शुगर आणखी लो होऊन त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लो शुगर असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात मेथी खाऊ नये.

अॅसिडीटी किंवा गॅसची समस्या – जर तुम्ही जास्त प्रमाणात मेथी खाल्ली तर तुम्हाला अॅसिडीटी, गॅसची समस्या सतावू शकते. त्यामुळे जास्त प्रमाणात मेथी खाऊ नये. तसंच जर तुम्हाला आधीच अॅसिडीटी झाली असेल तर त्यावेळी मेथी खाऊ नका नाहीतर तुमची अॅसिडीची समस्या आणखी वाढू शकते आणि तु्म्हाला त्रास होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.