Diabetes असणाऱ्या लोकांनी नारळ पाणी प्यावं का? वाचा शुगर वाढेल की कमी होईल…

नारळ पाणी हे अतिशय आरोग्यदायी पेय मानले जाते, त्यात नैसर्गिक साखर असते, त्यामुळे अनेकदा मधुमेहाचे रुग्ण संभ्रमात असतात की ते हे नैसर्गिक पेय पिऊ शकतात की नाही? याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढेल का?

Diabetes असणाऱ्या लोकांनी नारळ पाणी प्यावं का? वाचा शुगर वाढेल की कमी होईल...
diabetic patient drinking coconut water
| Updated on: May 21, 2023 | 10:00 AM

मुंबई: अनेकांना नारळ पाणी पिण्याची आवड असते, विशेषत: जेव्हा लोक समुद्रकिनारी सुट्टीवर जातात, तेव्हा ते प्यायचा मोह अनावर होतो. लोकांना बघून वाटतं आपणही नारळ पाणी प्यावं. नारळ पाणी हे अतिशय आरोग्यदायी पेय मानले जाते, त्यात नैसर्गिक साखर असते, त्यामुळे अनेकदा मधुमेहाचे रुग्ण संभ्रमात असतात की ते हे नैसर्गिक पेय पिऊ शकतात की नाही? याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढेल का? चला तर मग आजच या प्रश्नांची उत्तरे देऊया आणि सर्व अडचणी दूर करूया.

नारळ पाणी पिण्याचे फायदे

नारळ पाणी हे निरोगी आहाराचा भाग आहे, त्यात कॅलरी खूप कमी असतात, ज्यामुळे लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत नाही. गरम वातावरणात हे जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे आपल्याला डिहायड्रेशनपासून संरक्षण मिळते. विशेषत: समुद्राच्या सभोवतालचे हवामान दमट असते, ज्यामुळे घाम येतो. अशावेळी नारळाचे पाणी प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. तसेच यात अनेक पोषक तत्वे असतात जी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

अनेक संशोधन आणि अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की जो व्यक्ती नियमितपणे नारळ पाणी पितो त्याला इलेक्ट्रोलाइट असंतुलन समस्येचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी असतो. इलेक्ट्रोलाइट्स ही खनिजे आहेत जी आपल्या शरीराची उर्जा राखण्यास मदत करतात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी नारळ पाणी फायदेशीर आहे का?

नारळ पाणी सौम्य गोड आहे कारण त्यात नैसर्गिक साखर असते, म्हणून प्रश्न पडतो की हे पेय मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील आरोग्यदायी आहे की यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढेल?

नारळाच्या पाण्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी सामान्यत: फायदेशीर असते. याद्वारे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित करता येते, असे अनेक प्राण्यांवर करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे. नारळाच्या पाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५५ पेक्षा कमी असतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते हानिकारक नाही. फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या ड्रिंकचे रोजचे प्रमाण ठरवावे.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)