AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीच्या वेळेस आंबा खाताय? जरा थांबा तज्ज्ञांनी सांगितले यामागचे गंभीर कारण, जाणून घ्या

बहुतेक लोकांना उन्हाळा आंब्यांमुळे आवडतो. आंबा हा सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांमध्ये गणला जातो. पण अशातच तुम्ही जर रात्री आंबा का खाताय तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर मग तज्ञांकडून जाणून घेऊयात...

रात्रीच्या वेळेस आंबा खाताय? जरा थांबा तज्ज्ञांनी सांगितले यामागचे गंभीर कारण, जाणून घ्या
mangoesImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 01, 2025 | 11:43 AM
Share

आंब्याला फळांचा राजा म्हणतात. उन्हाळ्यात हे सर्वात जास्त आवडणारे फळ आहे. उन्हाळा सुरू झाला की आपल्यापैकी अनेकजण आंबा खुप आवडीने खातात. तसेच प्रत्येक ऋतूमध्ये हंगामी फळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा आंब्यांचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायद्याचे ठरते. कारण त्यात व्हिटॅमिन ए, सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. तथापि, तज्ज्ञांच्या मते, दिवसा आंबा खाणे फायदेशीर आहे, परंतु रात्री ते खाल्ल्याने काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

आहारतज्ज्ञ आइना सिंघल सांगतात की, बहुतेक लोकांना सकाळी किंवा दुपारी आंबा खायला आवडतो. त्याच वेळी, काही लोक रात्री देखील आंब्यांचे सेवन करतात. पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रात्री आंबा खाणे टाळावे. रात्री आंबा खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

पचनक्रियेवर परिणाम

रात्री शरीराची पचन प्रक्रिया मंदावते. त्यामुळे आंब्यासारखे जड आणि गोड फळ खाल्ले तर ते पचण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला गॅस, अपचन, पोटदुखी आणि जडपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रक्तातील साखर वाढली

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) खूप जास्त असते. रात्री आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढू शकते, विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते धोकादायक ठरू शकते. झोपण्यापूर्वी साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने इन्सुलिन संवेदनशीलतेवरही परिणाम होऊ शकतो.

वजन वाढणे

आंब्यामध्ये कॅलरीज आणि साखर दोन्ही मोठ्या प्रमाणात असतात. रात्री आंबा खाल्ल्यानंतर, शरीराला कॅलरीज बर्न करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही कारण आपण रात्री कोणतीही शारीरिक हालचाल करत नाही. अशा परिस्थितीत ते फॅटच्या स्वरूपात शरीरात जमा होऊ शकते आणि वजन वाढू शकते.

झोपेचा त्रास

आंबा खाल्ल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते, ज्यामुळे शरीर पूर्णपणे विश्रांती घेऊ शकत नाही. झोपण्यापूर्वी आंबा खाल्ल्यास झोपेचा त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत झोपेची गुणवत्ता बिघडू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने...
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने....
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या..
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती...
देशभरात 10 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलची तिसऱ्यांदा दरवाढ, किती रुपयांवर
देशभरात 10 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलची तिसऱ्यांदा दरवाढ, किती रुपयांवर.
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....