AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्र्या काढून ठेवा… अलर्ट आला, मुंबईकरांनो पुढच्या अडीच 3 तासात दाणादाण…

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस तर कधी उष्णता बघायला मिळतंय. त्यामध्येच आता हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुढील 3 तास अत्यंत महत्वाचे आहेत.

छत्र्या काढून ठेवा... अलर्ट आला, मुंबईकरांनो पुढच्या अडीच 3 तासात दाणादाण...
Rain warning
| Updated on: May 23, 2026 | 12:42 PM
Share

राज्यात आज अनेक भागात हवामानात मोठा बदल झाला. विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये थेट मोठा इशारा देण्यात आला. रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. यादरम्यानच आता हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला. मुंबईसह, रायगड आणि कोकणात पुढील तीन तासात पावसाला सुरूवात होईल. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊल होईल. भारतीय हवामान विभागाने आज सकाळी नाऊकास्टमध्ये हा इशारा दिला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये पाऊस होईल. यासोबतच पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रचंड उकाडा होता. या पावसामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातीलही काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला. पुढच्या आठवड्यापर्यंत मॉन्सून राज्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र, मॉन्सूनच्या पूर्वीच पाऊस कोसळताना दिसतोय. इगतपुरी शहरात अवकाळी पावसाची जोरदार सुरूवात झालीये. हवा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची सततधार सुरू आहे. अर्ध्या तासांपासून सुरू आहे पाऊस.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचे ढग कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात उन्हाने कहर केला. मात्र, मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळत आहे. राज्यावर सध्याच्या घडीला दुहेरी संकट बघायला मिळतंय. मोठा पाऊस होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यावर पावसाचे सावट आहे. सतत पाऊस सुरू आहे. लातूर, धाराशिव आणि सोलापूर येथेही आज पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय.

ऐन एप्रिल आणि मे महिन्यातही पाऊस पडताना दिसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पिंपरी चिंचवड शहरांमध्येही दुपारच्या सुमाराला अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती.शहराच्या विविध भागात विजेच्या कडकडाट सहमुसळधार पाऊस काल झाला. खेडमध्येही काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने हवामानात एक गारवा निर्माण झाला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ