AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात ज्यांचं सेवन करू नये अशा ‘4 गोष्टी’!

सध्या भारतातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या ऋतूत कोणत्या 4 गोष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया अशा 4 गोष्टी ज्या पावसाळ्यात खाल्ल्या तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं किंवा तुम्ही आजारीही पडू शकता.

पावसाळ्यात ज्यांचं सेवन करू नये अशा '4 गोष्टी'!
do not eat this food
| Updated on: Jul 07, 2023 | 1:41 PM
Share

मुंबई: पावसाळ्यात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. काय खायला हवं, काय नाही याची काळजी घ्यावी लागते. बदलत्या हवामानासोबत आपल्याला आपला आहार सुद्धा बदलावा लागतो. हवामान बदललं की आजार वाढतात, रोगराई पसरते. सध्या भारतातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या ऋतूत कोणत्या 4 गोष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया अशा 4 गोष्टी ज्या पावसाळ्यात खाल्ल्या तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं किंवा तुम्ही आजारीही पडू शकता.

हिरव्या भाज्या

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांपासून दूर राहावे. या भाज्या खाताना सुद्धा भाजी बनविण्याआधी या नीट धुवून घ्याव्यात. पावसाळ्यात या भाज्यांमध्ये किडे वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालेभाज्या विशेषतः टाळाव्यात.

मांसाहार

ज्यांना मांसाहाराची आवड आहे त्यांनी या ऋतूत खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. पावसाळ्यात व्यक्तीची पचनशक्ती कमकुवत असते आणि मांसाहारी अन्न पचविण्यासाठी तुमची पचनशक्ती मजबूत असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अशा हवामानात मांसाहारी पदार्थांचे सेवन न केल्यास उत्तम.

तळलेले अन्न

पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणे टाळावे. या ऋतूत तळलेले अन्न लवकर पचत नाही, ज्यामुळे आपल्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. यासोबतच मसालेदार पदार्थांचेही कमीत कमी सेवन करावे.

दही

पावसाच्या या ऋतूत दह्याचे सेवन शक्यतो टाळावे, असे डॉक्टरांचे मत आहे. दहीमध्ये बॅक्टेरिया असतात, ज्याचा या ऋतूत तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या ऋतूत शक्यतो दह्याचे सेवन करू नये.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.