AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Side Effects of skipping Breakfast: सकाळचा नाश्ता टाळताय ? हृदयावर होऊ शकतो परिणाम

Skipping breakfast: दिवसभराच्या कामासाठी शरीराला उर्जेची गरज असते. आणि ही उर्जा सकाळी केलेल्या नाश्त्यातून मिळते. नाश्ता टाळायची सवय असेल तर ती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Side Effects of skipping Breakfast: सकाळचा नाश्ता टाळताय ? हृदयावर होऊ शकतो परिणाम
महाराष्ट्रीय नाश्ता- पोहेImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 3:09 PM
Share

आजचं धावपळीचं जग आणि व्यस्त दिनक्रम यामध्ये अनेक जण सकाळी नाश्ता करणं टाळतात. वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीही पोटात कमी कॅलरी जातील असा विचार करून नाश्ता करत नाहीत. मात्र नाश्ता न करण्याची (skipping breakfast) ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. सकाळचा नाश्ता किंवा न्याहरी ही आपल्या निरोगी आयुष्यासाठी (health) महत्वपूर्ण आहे. सकाळी केलेला नाश्ता दिवसभरासाठी उर्जा देतो. कामाच्या व्यापात दुपारी, जेवणाची वेळ पाळली जातेच असं नाही. त्यामुळे भूक लागून डोकं दुखणं किंवा बराच वेळ उपाशी राहिल्याने ॲसिडिटी, जळजळ यासारखे त्रास होऊ शकतात. पण सकाळी पोटभर नाश्ता केल्यास अख्ख्या दिवसाची उर्जा तर मिळतेच पण ॲसिडिटीपासूनही बचाव होतो. सकाळची न्याहरी न केल्यास आरोग्यावर तसेच हृदयावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दिवसभर काम करण्यासाठी उर्जेचा उत्तम स्त्रोत म्हणजे नाश्ता. सकाळचा नाश्ता हा पोटभरीचा तसेच पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित राहते तसेच शरीराला पर्याप्त प्रमाणात उर्जाही मिळते. तसेच सकाळी लवकर न्याहरी केल्यास पचनासंबंधित फायदेही शरीराला होतात. न्याहरी करताना प्रथिन, साखर व कर्बोदके यांचे प्रमाण संतुलित असावे. नाश्ता करताना त्यात दूध, फळे यांचाही समावेश करावा.

नाश्ता न केल्यास होतात गंभीर परिणाम

  •  सकाळी नाश्ता न केल्यास हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात.
  •  नाश्ता करणे टाळल्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका 27 टक्क्यांनी वाढतो.
  • सकाळी न्याहरी केली नाही तर पोट बराच वेळ रिकामे राहते. नाश्ता स्किप केल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो .
  • नाश्ता करणे टाळले तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त वाढते.

नाश्ता न केल्यास होणारे अन्य नुकसान :

  • टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
  • सकाळी नाश्ता केला नाही तर रात्रीचे जेवण ते सकाळचे जेवण यामध्ये बराच काळ पोट रिकामे राहते. आणि जास्त खाल्ले जाते. त्यामुळे वजन वाढून व्यक्ती स्थूल होण्याची शक्यता वाढते.
  • नाश्ता न केल्यास भुकेमुळे डोकेदुखी, मायग्रेन, जळजळ, ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्याचा आपल्या तब्येतीवर गंभीर परिणाम होतो.
  • सकाळच्या वेळेत नाश्ता न केल्यास कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
  • नाश्ता न केल्यास पचनाशी संबंधित विकार होऊ शकतात. त्यामुळ केस गळणे, तुटणे अशा इतर समस्याही उद्भवू शकतात.
  • हे सर्व टाळायचे असेल तर सकाळी पौष्टिक व पोटभर नाश्ता करावा.
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा.
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल.
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला.
अजित पवार अमर रहे! अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला
अजित पवार अमर रहे! अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला.
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद
दादा तुम्ही परत या! कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची साद.
अजित पवार यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला सुरुवात
अजित पवार यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला सुरुवात.
काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात.
विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार
विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार.
अजित पवार यांचा रथातून शेवटचा प्रवास; कार्यकर्त्यांची गर्दी
अजित पवार यांचा रथातून शेवटचा प्रवास; कार्यकर्त्यांची गर्दी.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय मानवंदना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय मानवंदना.