नाना पाटेकरांच्या निधनानंतर हार्ट अटॅकची पुन्हा चर्चा; तुमचं हृदय किती फिट आहे? समजेल फक्त 1 मिनिटात! घरी करा 3 सोप्या टेस्ट

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हार्ट अटॅक बाबतची चिंता वाढली आहे. आपले हृदय फिट आहे की नाही हे तपासण्यासाठी काही सोप्य टेस्ट घरीच करता येतात. जाणून घ्या सविस्तर

नाना पाटेकरांच्या निधनानंतर हार्ट अटॅकची पुन्हा चर्चा; तुमचं हृदय किती फिट आहे? समजेल फक्त 1 मिनिटात! घरी करा 3 सोप्या टेस्ट
तुमचं हृदय किती फिट आहे? समजेल फक्त 1 मिनिटात! घरी करा 3 सोप्या टेस्ट
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 09, 2026 | 3:24 PM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट, हृदयाचे आरोग्य याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली असूनही आपले हृदय फिट आहे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसं तर आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी सहसा डॉक्टरांकडे जातात. पण हृदयाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी वारंवार डॉक्टरांकडे जाण्याची किंवा अनेक उपकरणांची गरज नाही. हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, काही सोप्या हालचालींद्वारे घरीच हृदयाच्या आरोग्याचे मूल्यांकन केले जाऊ शकते. डॉ. नवीन भामारी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत हृदय व रक्तवाहिन्यांची सहनशक्ती, स्नायूंची ताकद आणि हृदयाची गती पूर्ववत होण्याची क्षमता यांचे मूल्यांकन तीन टेस्ट द्वारे करता येत असल्याचे सांगितले.

पायऱ्या चढण्याची चाचणी

पहिला निकष फंक्शनल एरोबिक क्षमतेवर फोकस करतो. न थांबता किंवा रेलिंगला न धरता ६० सेकंदात ६० पायऱ्या चढा. या वेगाने चढताना तुमच्या शरीराच्या प्रतिसादाचे परीक्षण केल्याने हृदयाच्या सहनशक्तीचे त्वरित मोजमाप मिळते. डॉक्टर सांगतात की, जर तुम्हाला धाप लागत नसेल, छातीत दुखत नसेल आणि तुम्ही न थांबता चढू शकत असाल, तर तुम्ही एकंदरीत खूप तंदुरुस्त असण्याची शक्यता आहे.
खुर्चीवर सिट-अप टेस्ट

Loading...

दुसरी चाचणी शरीराच्या खालच्या भागाची ताकद आणि फंक्शनल मोबिलीटी तपासते. विशेषतः ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी ही टेस्ट उपयुक्त ठरू शकते. यासाठी एका साध्या खुर्चीवर बसा आणि दोन्ही हात छातीवर दुमडून ठेवा. खुर्चीच्या हँडलचा आधार न घेता, ४० वर्षांनंतरही तुम्ही न थांबता १६ पेक्षा जास्त वेळा बसू आणि उठू शकत असाल, तर तुमची फिटनेस चांगली असल्याचे संकेत मिळतात. याउलट, १४ पेक्षा कमी वेळा बसण्या-उठण्याची क्रिया पूर्ण होत असेल, तर शारीरिक क्षमता सुधारण्याची गरज असू शकते.

हार्ट रेटची रिकव्हरी

कोणतेही हेवी काम केल्यानंतर वाढलेली हार्ट रेट म्हणजेच हृदयाचे ठोके सामान्य होण्यासाठी किती वेळ लागतो, हे या टेस्टद्वारे तपासले जाते. शारीरिक मेहनतीनंतर शरीराची ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम किती चांगल्या प्रकारे पूर्ववत होते, याचे प्राथमिक संकेत या चाचणीतून मिळू शकतात. यासाठी तीन ते पाच मिनिटे धावणे, जिने चढणे किंवा ट्रेडमिलवर चालणे यांसारखा कार्डिओ व्यायाम करा. त्यानंतर लगेच नाडी मोजा आणि एक मिनिट विश्रांती घेऊन पुन्हा नाडी तपासा.

एका मिनिटात हृदयाचे ठोके २५ पेक्षा जास्त कमी झाल्यास रिकव्हरी चांगली असल्याचे संकेत मिळू शकतात. मात्र, ठोक्यांमध्ये १२ पेक्षा कमी घट झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते. मात्र, या आकड्यांचा अर्थ व्यक्तीचे वय, आरोग्य आणि व्यायामाची तीव्रता यांनुसार बदलू शकतो. त्यामुळे केवळ या चाचणीवरून हृदयाच्या आरोग्याचे निदान करू नये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us