AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालाही तुमच्या ‘युरीन’ मध्ये पांढरे कण दिसतात का? मग तुम्हाला ‘हे’ आजार असू शकतात; जाणून घ्या, काय आहेत कारणे आणि त्यावरील उपचार!

मुत्रविसर्जनातून आम्हाला पांढरे कण दिसतात अशा तक्रारी घेऊन अनेक रुग्ण डॉक्टरांकडे येतात. बहुतांश प्रकरणात ते, अजिबात धोकादायक ठरत नाही. परंतु कधी-कधी आपल्याला यामुळे गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

तुम्हालाही तुमच्या ‘युरीन’ मध्ये पांढरे कण दिसतात का? मग तुम्हाला ‘हे’ आजार असू शकतात; जाणून घ्या, काय आहेत कारणे आणि त्यावरील उपचार!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 13, 2022 | 5:59 PM
Share

सामान्यतः युरिनचा रंग (The color of the urine) हलका पिवळा असतो आणि त्यात कोणत्याही प्रकारचे खडे किंवा कण दिसत नाहीत. परंतु काही प्रकरणांमध्ये, जसे की गर्भधारणा, मुत्रमार्ग संसर्ग किंवा किडनी स्टोन (Kidney stone) आदींमुळे लघवीतून पांढरे कण जातात, ज्यांच्या मुळे लघवी गढूळ होते. गर्भधारणा आणि मूत्रमार्गाचा संसर्ग या लघवीचा रंग बदलण्याची सामान्य कारणे सांगता येतील. परंतु अशी लक्षणे दिसतात तेव्हा इतर रोग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गर्भधारणेदरम्यान, स्त्रीच्या हार्मोन्समध्ये (In female hormones) अनेक बदल होतो, ज्यामुळे योनीतून स्त्राव झाल्यामुळे अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. शरीरातून बाहेर पडतांना ते मुत्रमार्गाद्वारे लघवीत मिसळल्याने पांढरे कण दिसतात. जर, तुम्ही गर्भवती असाल तर काही काळजी करण्याचे कारण नाही. हि, सामान्य बाब आहे. जर, तुम्हाला खाज सुटणे, जळजळ आणि स्त्राव गडद होण्याची चिन्हे दिसली तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

यूटीआय

(युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन) मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे लघवीतून पांढरे कण दिसणे सामान्य आहे. जेव्हा बॅक्टेरिया मूत्रमार्गाद्वारे मूत्राशय, मूत्रपिंड किंवा योनीमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते तेथे पोहोचतात आणि आणखी वाढतात. यानंतर ते संसर्ग पसरवतात, यालाच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतात. महिलांसह पुरुषांनाही मूत्रमार्गाच्या संसर्गाचा सामना करावा लागतो आणि मूत्रात पांढरे कण देखील आढळू शकतात.

ओव्हुलेशन

काही स्त्रियांमध्ये ओव्हुलेशनच्या वेळी योनीतून पांढर्‍या रंगाचा चिकट पदार्थ भरपूर प्रमाणात तयार होतात. त्याचा रंग पांढरुका असू शकतो. कधी कधी हा चिकट पदार्थ लघवीसोबत बाहेर पडतो. अशा स्थितीत या चिकट पदार्थाचा उग्र वास येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

किडनी स्टोन

जेव्हा शरीरात यूरिक ऍसिड किंवा कॅल्शियम ऑक्सलेट सारख्या काही पदार्थांची पातळी खूप वाढते तेव्हा किडनी स्टोन होतो. या दोन्ही गोष्टींचे प्रमाण जास्त असल्याने ते मूत्रमार्गात जमा होतात जे नंतर किडनी स्टोनमध्ये बदलू शकतात. जेव्हा खड्यांचा आकार लहान असतो, तेव्हा तो लघवीसह शरीरातून सहज बाहेर जातो जे पांढरे कण म्हणून दिसू शकतात.

प्रोस्टेटायटीस

प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होणार्‍या जळजळांना प्रोस्टेटायटिस म्हणतात. हे सहसा बॅक्टेरियामुळे होते. त्यामुळे लघवी करताना त्यात पांढरे कणही दिसतात.

यीस्ट इन्फेक्शन

यीस्ट इन्फेक्शनमुळे लघवीमध्ये पांढरे कणही येऊ शकतात. Candida albicans नावाची बुरशी निरोगी शरीरात नैसर्गिकरित्या आढळून येते, परंतु अपवादात्मक परिस्थितींमध्ये, ती योनीमध्ये वेगाने वाढू शकते आणि संसर्गास कारणीभूत ठरू शकते. या संसर्गाचा परिणाम बहुतेकदा गडद पांढरा स्त्राव होतो. हा स्त्राव मूत्रात मिसळू शकतो आणि पांढरे कण दिसू शकतात.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश