तुम्हालाही सामान्य व्यक्तीपेक्षा थंडीचा अधिक त्रास होतो?; तर असू शकतो ‘हा’ आजार

तुम्हालाही सामान्य व्यक्तीपेक्षा थंडीचा अधिक त्रास होतो?; तर असू शकतो 'हा' आजार
प्रातिनिधीक फोटो

तुम्ही तुमच्या आसपास असे अनेक लोक पाहिले असतील ज्यांना सामान्य लोकांपेक्षा अधिक थंडी वाजते. थंडी वाढल्यास (winter weather) त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असे लोक थंडीच्या दिवसांमध्ये घराच्या बाहेर पडणे टाळतात. तसेच घराच्या बाहेर पडायचे झाल्यास विशेष काळजी घेतात. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की या लोकांना एवढी थंडी का वाजते?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 21, 2022 | 4:34 PM

Winter Health Tips : तुम्ही तुमच्या आसपास असे अनेक लोक पाहिले असतील ज्यांना सामान्य लोकांपेक्षा अधिक थंडी वाजते. थंडी वाढल्यास (winter weather) त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असे लोक थंडीच्या दिवसांमध्ये घराच्या बाहेर पडणे टाळतात. तसेच घराच्या बाहेर पडायचे झाल्यास विशेष काळजी घेतात. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की या लोकांना एवढी थंडी का वाजते? (winter in body)अनेक जण या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र असे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. अशा व्यक्तींना पुढे चालून अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. अशा व्यक्तींना नेमक्या कोणत्या समस्या उद्धभवतात याची माहिती आज आपण घेणार आहोत. तुमच्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिनचे प्रमाण कमी असेल तर तुम्हाला अशा समस्येंचा सामना करावा लागू शकतो.

मधुमेह : मधुमेह ही आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. अनेकांना मधुमेहाचा त्रास असतो. या आजारात शरीरातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित झाल्याने विविध समस्या निर्माण होऊ शकतात. मधुमेहाचा तुमच्या रक्तप्रवाहावर देखील विपरित परिणाम होतो. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्हाला एका सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक थंडी वाजू शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तींना थंडीच्या दिवसांमध्ये सारखा सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

ऍनेमिया : तुमच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असल्यास तुम्हाला सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक त्रास होऊ शकतो. तुमच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. अशक्तपणा आल्यास थंडी अधिक जाणवते.

व्हिटॅमिन बी 12 ची कमी : तुमच्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन बी 12 ची कमी असेल तर तुम्हाला थंडीचा त्रास जाणून शकतो. त्यामुळे जर असा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन बी 12 असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करावे.

नसांमध्ये कमजोरी : अनेकवेळा नसा कमजोर पडतात. अशावेळी माणूस अशक्त बनतो. शरीरात अशक्तपणा आल्याने थंडी अधिक जाणवते.

शरीराला आतून गरम ठेवण्यासाठी या पदार्थांचे सेवन करा

जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर थंडीपासून बचावासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमितपणे फळे, दूध, तूप, मध, तिळ, गूळ अशा पदार्थ्यांचा समावेश करा.

संबंधित बातम्या

डोळे फडफडणं शुभ की अशुभ, काय म्हणतं विज्ञान ? जाणून घ्या नेमकं कारण

Covid Guidelines: मुलांना कोरोना झाला तर नक्की काय करायचं? केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी

गर्भधारणा होत नाही आहे? मग करा हे उपाय, लवकरच मिळणार गूडन्यूज

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें