Covid Guidelines: मुलांना कोरोना झाला तर नक्की काय करायचं? केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी

Covid Guidelines: मुलांना कोरोना झाला तर नक्की काय करायचं? केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी
Mask For Kids

कोरोना संसर्गाचा धोका वाढत असतानाच केंद्र सरकारने नवी गाईडलाईन जारी केली आहे. पाच वर्षाखालील मुलांना मास्क वापरणे बंधनकारक नाही, तसेच 18 वर्षाखालील मुलांना कोरोना झाल्यास त्यांच्यावर उपचार करताना अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीचा वापर करू नये.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 21, 2022 | 10:56 AM

नवी दिल्ली: कोरोना संसर्गाचा धोका वाढत असतानाच केंद्र सरकारने नवी गाईडलाईन जारी केली आहे. पाच वर्षाखालील मुलांना मास्क वापरणे बंधनकारक नाही, तसेच 18 वर्षाखालील मुलांना कोरोना झाल्यास त्यांच्यावर उपचार करताना अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीचा वापर करू नये. तसेच त्यांचावर उपचार करण्यासाठी स्टेरॉयडचा वापर केला जात असेल तर 10 ते 14 दिवसाात त्याचे डोस कमी करावेत, अशा सूचना नव्या गाईडलाईनमध्ये देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईनमध्ये महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पाच वर्षाखालील मुलांना मास्क वापरण्यास देऊ नये. तसेच आई-वडिलांच्या निगराणीत 6 ते 11 वर्षा दरम्यानची मुलं सुरक्षित आणि योग्य पद्धतीने मास्कचा वापर करू शकतात, असं केंद्राने म्हटलं आहे.

ओमिक्रॉन गंभीर आजार नाही

12 वर्ष आणि त्यावरील अधिक वयाच्या लोकांना मात्र मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. ओमिक्रॉनमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने तज्ज्ञांनी आढावा घेऊन ही गाईडलाईन ठरवली आहे. इतर देशांतील आकडेवारीनुसार ओमिक्रॉनमुळे होणारा आजार फारसा गंभीर नाही. मात्र, संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने काळजी घेणं आवश्यक आहे.

लक्षणे नसलेल्यांसाठी काय?

कोरोना संसर्गाची लक्षणे नसलेले आणि सौम्य असलेल्यांच्या उपचारासाठी अँटीमायक्रोबियल्स किंवा प्रोफिलैक्सिसची शिफारस केली जाऊ शकत नाही. जोपर्यंत सुपरअॅडेड इन्फेक्शनची लक्षणे वाटत नाही किंवा त्याची शंका वाटत नाही तोपर्यंत मध्यम आणि गंभीर आजार असलेल्यांना अँटीमाइक्रोबियल्स औषधे जोपर्यंत देऊ नये असंही म्हटलं आहे. स्टेरॉयडचा वापर योग्यवेळी, योग्य डोस आणि योग्य कालावधीसाठी दिला जावा, असंही म्हटलं आहे.

स्टेरॉयडचा वापर योग्यवेळी करा

दिशा-निर्देश में कहा गया कि स्टेरॉयड का इस्तेमाल सही समय पर, सही खुराक में और सही अवधि के लिए किया जाना चाहिए. स्वास्थ्य मंत्रालय ने कहा कि इन दिशा-निर्देशों की आगे और नए सबूत की उपलब्धता पर समीक्षा की जाएगी और इसे अपडेट किया जाएगा.

राज्यातील आकडा काय?

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांचा (Maharashtra Corona Update) आकडा चाळीस हजारांच्या खाली गेला होता, मात्र काल राज्यात पुन्हा 46 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने पु्न्हा चिंता वाढली आहे. 46 हजार 197 नवे कोरोना रुग्ण वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या 24 तासात 37 कोरोना रुग्णांच्या मृत्युचीही नोंद झाली आहे. तर काल राज्यात ओमिक्रॉनचे (Omicron Update) 125 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहेत, त्यातच आकडेवारी घटल्याने थोडा दिलासा मिळाला होता, राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णयही झाला मात्र आत्ताची आकडेवारी शाळांचीही चिंता वाढवणारी आहे.

मुंबईतील दरदिवशीची रुग्णसंख्या वीस हजारांच्या पुढे पोहोचल्याने चिंता वाढली होती, मात्र गेल्या काही दिवासांपासून मुंबईला सतत दिलासा मिळत असल्याने मुंबई महानगरपालिकेची चिंता कमी झाली आहे. मुंबईत काल दिवसभरात 5 हजार 708 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. येत्या सोमवारपासून मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना मुंबईतील रुग्णसंख्येतील घट कायम असणे ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.

संबंधित बातम्या:

मासिक पाळीच्या दिवसात तू अल्कोहोलचं सेवन करतेय…थांब मग जरा, हे केल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घे…

तुम्ही नेहमी घेता पेरासिटामोलची गोळी…मग जाणून घ्या पेरासिटामोलबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी

Fever | ताप आल्यानंतर बरं वाटण्यासाठी करावेत असे 8 सोपे उपाय, ज्यानं निश्चितच दिलासा मिळेल!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें