Fever | ताप आल्यानंतर बरं वाटण्यासाठी करावेत असे 8 सोपे उपाय, ज्यानं निश्चितच दिलासा मिळेल!

Health Tips हिवाळा आला की सर्दी, खोकला आणि ताप हे अनेक घरात दिसून येतात. त्यात कोरोनाचं संकट अजून कायम आहे. त्यामुळे अनेकांना ताप येतोय. त्यामुळे अशावेळी तापासोबत घरात राहू कसा सामना करायचा. किती ताप म्हणजे तो गंभीर असतो. याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसंच या 8 गोष्टी करा आणि तापापासून मुक्त व्हा.

Fever | ताप आल्यानंतर बरं वाटण्यासाठी करावेत असे 8 सोपे उपाय, ज्यानं निश्चितच दिलासा मिळेल!
ताप आलेल्याचा प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 7:08 PM

ताप येणं याला कधी हलक्यात घेऊ नका. सध्या कोरोनाची (Corona) पुन्हा लाट ओसळली आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी, खोकला आणि ताप येतोय. हिवाळा सुरु असून अचानक थंडी वाढल्यामुळे याचाही त्रास अनेकांना होतोय. कुठलंही आजारपण कधीही अंगावर काढू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्या. आज आपण तापाबद्दल जरा जाणून घेणार आहोत. तसंच ताप (Fever) आल्यावर घरगुती उपाय (Home remedies) काय केले तर चालेल तेही पाहणार आहोत. पण हो कुठलेही उपाय करण्यापूर्वी एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या. शरीराचं साधारण तापमान 97 ते 99° F या दरम्यान असतं. जेव्हा शरीराचं तापमान 100.4° F पर्यंत जास्त तेव्हा आपण ताप आला असं म्हणतो. तर गंभीर ताप हा वयानुसार ठरतो. एक महिन्यापेक्षा कमी वयाच्या बाळाला 100.4° F ताप असल्यास तो गंभीरस्वरुपात मोजला जातो. तर एक महिन्यापेक्षा मोठ्या मुलांना 102° F ताप म्हणजे गंभीर ताप तर वयस्कर व्यक्तीला 103° F ताप म्हणजे चिंतेची बाब असते.

…तर लगेचच डॉक्टरकडे जायला हवं!

एक महिने किंवा त्यापेक्षा कमी दिवसाच्या बाळाला 100.4°पेक्षा जास्त ताप असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. तर ताप असताना चिमुकला डोळ्यातून संपर्क करतो, व्यवस्थेत बोलतो खेळतोय, त्याला दिलेले पेय तो पितोय तर अशावेळी चिंता करण्याची गरज नसते. मात्र चिमुकला तापाने फणफणत असेल त्याला थंडी वाजून सतत ताप येतो, अगदी तीन दिवस झाले तरी ताप उतर नाही, सतत उल्टी येणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि लघवीच्या वेळी चिमुकला रडत असेल तर अशावेळी डॉक्टरांशी संपर्क करुन योग्य तो औषध उपचार केला पाहिजे.

तापावर घरगुती उपाय

1. जास्त पाणी पिणे – हो, आपल्याला ताप आल्यावर आपली खाण्याची इच्छा नसते. उलटी होत असल्याने आपण काही खायला बघत नाही. मग अशावेळी जास्त पाणी प्यायला पाहिजे. कारण जर आपण पाणी प्यायला नाही तर डिहाइड्रेशनची समस्या होऊ शकते. म्हणून ग्लोकोज पाणी जास्त जास्त घेतलं पाहिजे. सोबत फळांचा रस आणि काढा हेही घेतलं पाहिजे.

2. भरपूर झोपा – आजारपणामध्ये जेवढा जास्त तुम्ही आराम करता, झोपता तेवढा लवकर तुम्ही बरे होतात. शरीराला या दिवसांमध्ये आरामाची खूप गरज असते.

3. कोमट पाण्याने आंघोळ – हो, बरोबर आपल्या अनेक जण सांगतात ताप आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करावी. पण नाही, थंड्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुला सर्दी लागू शकते. म्हणून अशावेळी तापामध्ये कायम कोमट पाण्याने आंघोळ करावी. कोमट पाण्यामुळे शरीरातील नसा मोकळ्या होतात.

4. हलके आणि सुती कपडे घ्याला – ताप आल्यावर हलके आणि सुतीकडे घ्यायला पाहिजे. अनेक जण थंडी वाजते म्हणून जाड कपडे घालतात. त्यामुळे शरीरातील तापमान कमी होण्यास मदत होत नाही. शरीराला पुरेसी हवा लागणं महत्त्वाचं असतं. तसंच रोज कपडे बदलले गेले पाहिजे.

5. स्पंज करा – जर तुम्हाला आंघोळ शक्य नसेल तर अशावेळी थंड पाण्याने स्पंज करा. यामुळे शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होते. स्पंजिंग करता लक्षात ठेवा एका भागाला स्पंज करताना तेवढ्याच भाग उघडा ठेवा बाकी भागावर पांघरुन टाकून ठेवा.

6. बर्फ खा – हो, बरोबर ऐकलं तुम्ही पाणी प्यायलानेही तुम्हाला जर उल्टी होत असेल आणि अशाने तुमच्या शरीरात काही जात नसेल तर, बर्फ चोखा त्यामुळे शरीरात पाणी जाईल. यात सगळ्यात बेस्ट म्हणजे बर्फाच्या ट्रेमध्ये ज्यूस टाका आणि हे क्यूब चोखा. त्यामुळे शरीराता ज्यूस जाईल.

7. गरम पाण्याने गरारा करा – गरम पाण्याने गरारा करणे कधीही चांगलं. यामुळे घसा शेकला जातो. एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा मिठ घालून तुम्ही गरारा करा. तसंच गरम पाण्यात ऑपल व्हिनेगर आणि मध मिक्स करुन याचाही उपाय करा तुम्हाला फायदा होईल.

विशेष सूचना- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं नको – इबुप्रोफेन हे 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला देऊ नये. लहान मुलांना तापात डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठलीही औषधं देऊ नका.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

संबंधित बातम्या :

मासिक पाळीच्या दिवसात तू अल्कोहोलचं सेवन करतेय…थांब मग जरा, हे केल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घे…

Health Care : शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी या 5 नॉन स्टार्च भाज्यांचा आहारात समावेश करा!

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.