AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालाही पटापट वजन कमी करायचे आहे का..? मग, सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ 3 पद्धतीने  लिंबूपाणी प्या!

जलद वजन कमी करण्यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी या 3 मार्गांनी लिंबूपाणी प्या. वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काही आरोग्यदायी पेयांचा आहारात समावेश करू शकता. मुख्य बातमी

तुम्हालाही पटापट वजन कमी करायचे आहे का..? मग, सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ 3 पद्धतीने  लिंबूपाणी प्या!
लिंबूपासून बनवलेल्या अनेक पेयांचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो.
Siddhi Bobade
Siddhi Bobade | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 28, 2022 | 5:03 PM
Share

लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे. खरं तर, एकाच ठिकाणी कामाचे तास आणि वेळेअभावी वर्कआउट न केल्यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. याचे एक कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी. लिंबूपाणी तुमचे शरीर डिटॉक्स करतात. चयापचयाची गती वाढवतात. लिंबूपासून बनवलेल्या अनेक पेयांचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो. योग्य पद्धतीने घेतलेले लिंबूपाणी (Lemonade )जलद वजन कमी करण्यास मदत करेल. लिंबूपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या आरोग्यदायी पेयांचा (Of healthy drinks)आहारात समावेश करू शकता. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम, पेक्टिन आणि फायबर असते. हे पोषक तत्व आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते वजन कमी करण्यासाठी हे करतात. हे फ्री रॅडिकल्ससारख्या समस्यांपासून संरक्षण (Protection from problems) करण्यास मदत करतात.

लिंबू आणि मध

लिंबू आणि मधाचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते. बहुतेक लोक त्यांच्या आहारात लिंबाचा समावेश करतात. यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून, त्यात एक चमचा मध घाला. या पेयाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

लिंबू आणि आले

आपण रोजच चहामध्ये अदरकचा वापर करतो. हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी तुम्ही आल्याचाही वापर करू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि आल्याचा रस मिसळा. त्यात काळे मीठ टाका. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. हे पेय तुमचे शरीर डिटॉक्स करण्याचे काम करेल. हे पाणी तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा पिऊ शकता. हे पेय प्यायल्यानंतर तुम्ही बराच वेळ पोट भरलेले असल्याने, भूक कमी लागते.

लिंबू आणि पुदिन्याचे पाणी

उन्हाळ्यात पुदिना सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. लिंबू आणि पुदिना पाण्याचा आहारात समावेश करू शकता. यासाठी एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस घालून, त्यात पुदिन्याच्या पानांचा रस घाला. त्यात थोडे काळे मीठ टाका. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. हे दोन्ही पदार्थ कमी कॅलरी आहेत. हे चरबी जलद बर्न करण्यास मदत करते. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे लवकर भूक लागत नाही. हे पाणी तुम्ही दिवसभर पिऊ शकता. हे वजन जलद कमी करण्यास मदत करेल.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं