हे रक्त जगातील केवळ 45 लोकांच्या शरीरात वाहतं, Golden Blood बद्दल माहितेय का?

रचना भोंडवे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 12, 2023 | 5:25 PM

या आठ रक्ताशिवाय जगातील काही मोजक्या लोकांमध्ये आढळणारा एक रक्तगट आहे, जो अत्यंत दुर्मिळ आहे.

हे रक्त जगातील केवळ 45 लोकांच्या शरीरात वाहतं, Golden Blood बद्दल माहितेय का?
Rh Null blood group
Image Credit source: Social Media

शाळेत असताना आपल्या सर्वांना रक्तगटांविषयी शिकवलं जातं. जगात साधारणत: 8 प्रकारचे रक्तगट असतात, ज्यात ए, बी, एबी आणि ओ यांचा समावेश असतो. हे रक्तगट सकारात्मक आणि नकारात्मक विभागले जाऊ शकतात. रक्त आपल्या शरीरात ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईड वाहून नेण्याचे काम करते. फुफ्फुसातून आपल्या उर्वरित शरीरात ऑक्सिजन वाहून नेलं जातं आणि उर्वरित सर्व शरीरातून फुफ्फुसांमध्ये कार्बन डाय ऑक्साईड आणलं जातं. या आठ रक्ताशिवाय जगातील काही मोजक्या लोकांमध्ये आढळणारा एक रक्तगट आहे, जो अत्यंत दुर्मिळ आहे. हा रक्तगट फक्त अशा लोकांमध्ये असतो ज्यांचा Rh फॅक्टर Null असतो. एका रिपोर्टनुसार, हे रक्त जगातील केवळ 45 लोकांच्या शरीरात वाहतं.

या रक्ताला गोल्डन ब्लड म्हणतात. हे 1961 साली पहिल्यांदा आढळून आलं. हे रक्त इतर सामान्य रक्तगटापेक्षा खूप वेगळे आहे, ज्यामुळे त्याला ‘गोल्डन ब्लड’ असे नाव देण्यात आले आहे. आजारी व्यक्तीसाठी रक्ताची गरज असताना रक्तपेढीत काही साधारण रक्त देऊन आपल्या गरजेनुसार रक्त मिळू शकते, पण जेव्हा गोल्डन ब्लडचा विचार केला जातो, तेव्हा त्याची किंमत सोन्यापेक्षा जास्त असते, हे इतके दुर्मिळ असते.

गोल्डन ब्लडचे कारण जनुकीय उत्परिवर्तनांमुळे होते आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचं दुसरं कारण म्हणजे जवळच्या नात्यातील लग्न, ज्यामुळे गोल्डन ब्लड असण्याची शक्यता वाढते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

याबाबत ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन’मध्ये अहवालही प्रसिद्ध करण्यात आला होता. या रक्तगटातील लोकांना ॲनिमियाचा धोका अधिक असतो. अनेक वेळा अशा लोकांची ओळख पटल्यावरसुद्धा सुरक्षे खातर या लोकांचा पर्दाफाश केला जात नाही.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI