AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उशीलाही असते एक्सपायरी डेट? जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ, अन्यथा…

उशी ही केवळ झोपेसाठीचा आरामदायक उपाय नाही, तर मानेच्या योग्य पोश्चर आणि एकूण आरोग्यासाठीही अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे केवळ सवयीपोटी नव्हे, तर आम्ही तुम्हाला अशा काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की उशी बदलण्याची वेळ आली आहे.

उशीलाही असते एक्सपायरी डेट? जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ, अन्यथा...
| Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 10:24 PM
Share

बहुतेक घरांमध्ये उशी ही झोपेचा अविभाज्य भाग असते. आपण दररोज त्यावर डोके ठेवून झोपतो, पण या उशीमुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं, हे तुम्हाला माहिती आहे का? आपण बहुतेक वेळा उशीच्या फक्त कव्हरचीच सफाई करतो, पण खऱ्या धोक्याचं मूळ उशीच्या आत लपलेलं असतं.

उशी ही किटाणूंचं केंद्र?

उशीला वर्षानुवर्षं वापरल्याने तिच्या आत घाम, थुंकी, केस, मृत त्वचा आणि ओलावा साठत जातो. हे सर्व घटक बुरशी, जीवाणू आणि धूळ यांचं प्रजनन वाढवतात. अशा उशीचा दररोज वापर केल्याने चेहऱ्याला अ‍ॅलर्जी, डोकेदुखी, वारंवार सर्दी-खोकला होणे आणि त्वचाविकार होण्याचा धोका वाढतो. विशेषतः ज्यांना सायनस, दम्याचे त्रास आहेत, त्यांच्यासाठी अशा उश्या अधिक धोकादायक ठरू शकतात.

उशी बदलण्याची वेळ कधी ओळखाल?

तज्ज्ञांच्या मते, दररोज वापरली जाणारी उशी किमान १८ महिने ते २ वर्षांमध्ये बदलली पाहिजे. पण त्याआधीही काही संकेत दिसल्यास ती लगेच बदलणं योग्य ठरतं:

1. उशीचं मूळ स्वरूप (शेप) बिघडलेलं वाटत असेल.

2. उशीवर झोपल्यावर सतत डोके किंवा मानेत वेदना होत असतील.

3. उशीला फोल्ड केल्यावर ती पूर्ववत होत नसेल.

4. उशीतील रुई एकाच ठिकाणी गोळा झाल्यास किंवा त्यात गाठी तयार झाल्या असतील.

5. सकाळी उठल्यावर मानेत किंवा पाठीत जडपणा वाटत असेल.

फक्त कव्हर बदलणं पुरेसं नाही

अनेकांना वाटतं की, उशीचं कव्हर वेळोवेळी बदललं की स्वच्छता झाली. पण वास्तव वेगळं आहे. उशीच्या आतील भागात साचलेली घाण कव्हरने झाकलेली असते, पण ती अदृश्य असली तरी शरीरावर परिणाम करत असते. सतत संपर्कामुळे चेहऱ्यावर पुरळ, खाज, किंवा डोळ्यांच्या भोवती सूज येऊ शकते. त्यामुळे उशीची स्वच्छता आणि वेळेवर बदली करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे.

उशीतून होणाऱ्या आजारांची शक्यता

  • वारंवार सर्दी, खोकला, थकवा किंवा ताप.
  • त्वचेवर अ‍ॅलर्जी किंवा पुरळ होणे.
  • मानेत किंवा पाठीच्या वरच्या भागात वेदना किंवा अकडणे.
  • नीट झोप न लागणे किंवा झोपमधे खोडणं.

उपाय आणि काळजी

  • उशीला दर आठवड्याला उन्हात वाळवणं आणि वेळोवेळी कव्हर बदलणं.
  • शक्य असल्यास वॉशेबल उशा वापरणं.
  • उशीला अर्ध फोल्ड करा, ती लगेच मोकळी झाली नाही, तर बदलण्याची गरज आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.