AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात हे पदार्थ, चुकूनही करू नका यांचे सेवन

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. हृदयाची काळजी घेण्यासाठी आहारामध्ये काही पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. तर काही पदार्थांचे सेवन मर्यादित करणे गरजेचे असते.

हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात हे पदार्थ, चुकूनही करू नका यांचे सेवन
हृदय जपा
| Edited By: | Updated on: Nov 15, 2024 | 2:58 PM
Share

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ते शरीराच्या प्रत्येक भागाला रक्तपुरवठा करण्याचं काम करते. ज्यामुळे ऑक्सिजनच्या संचार होतो. हृदयात कोणताही प्रकारची समस्या असल्यास जीवन कठीण होऊ शकते. अनेक वेळा आपल्याच काही सवयींमुळे ह्रदय कमकुवत होते. जर आपण योग्य आहाराचा अवलंब केला नाही तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जाणून घेऊया कोणते पदार्थ आहेत ज्यांना हृदयाचा शत्रू म्हटल्या जाते.

तळलेले पदार्थ : तळलेले अन्न हृदयासाठी हानिकारक आहे. कारण ते चरबीने भरलेले असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयाला हानी पोहोचते.

अल्कोहोल : अल्कोहोलच्या सेवनाने हृदयाच्या समस्या आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. ही सवय तुम्ही जितक्या लवकर सोडाल तितकी तुमच्या आरोग्यासाठी चांगली असेल.

गोड पदार्थ : मिठाई, केक आणि पुडिंग यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो म्हणून मिठाचे सेवन मर्यादित करा.

खारट गोष्टी : चिप्स, फ्रेंच फ्राईज या खाद्यपदार्थांमध्ये मीठ जास्त असते. मिठामध्ये असलेले सोडियम रक्तदाब वाढवते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

लालमासा : लाल मासा मध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. ते नियंत्रित प्रमाणात घेणे चांगले आहे.

कोल्ड् ड्रिंक : लहान मुले, वृद्ध आणि तरुण सर्व वयोगटातील लोकांना थंड पेयाचे सेवन करणे आवडते, परंतु त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे दीर्घकाळ हृदयविकार होऊ शकतात.

प्रक्रिया केलेले मास : सॉसेस, सलामी आणि हॉट डॉग यासारख्या प्रक्रिया केलेल्या मासांमध्ये मीठ असते. ते हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. त्यांच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

मैदा असलेले पदार्थ : पिझ्झा, बर्गर आणि व्हाईट ब्रेड सारखे पिठापासून बनवलेले पदार्थ लवकर पचतात आणि त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात त्याऐवजी संपूर्ण धान्य पदार्थ निवडणे चांगले.

बटर आणि तूप : बटर आणि तुपात संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. जे कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयाला हानी पोहोचवू शकते. ते फक्त मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Follow Us
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....