AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Blood Pressure: उच्च रक्तदाब कमी करायचाय? मग हे कराच!

उच्च रक्तदाबाचा त्रास हा आजकाल खूप कॉमन आहे. अनेक लोक या आजाराचा सामना करताना दिसतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकतं. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.

Blood Pressure: उच्च रक्तदाब कमी करायचाय? मग हे कराच!
पाणी पिऊन कमी करु शकता उच्च रक्तदाबाची समस्याImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jul 18, 2022 | 4:06 PM
Share

आजकाल बऱ्याच जणांना उच्च रक्त दाबाचा (Blood Pressure) त्रास होताना दिसतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकतो. अयोग्य जीवनशैली (bad lifestyle), अपूर्ण झोप, व्यायामाचा अभाव अशा अनेक घातक सवयी उच्च रक्तदाबासाठी (high blood pressure) कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे या समस्येचा सामना करणाऱ्यांना डॉक्टर जीवनशैली सुधारण्याचा, चौरस आहार, पुरेशी झोप आणि व्यायामाचा सल्ला देतात. सामान्य रक्तदाब (ब्लड प्रेशर) 120/80mmHg पर्यंत असते. 120 ते 140 सिस्टोलिक आणि 80 ते 90 डायस्टोलिक च्या दरम्यान असणाऱ्या रक्तदाबाला प्री-हायपरटेंशन म्हटले जाते. तर 140/90 पेक्षा जास्त आकडा आल्यास त्याला हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब) मानले जाते. वयानुसार ही रेंज बदलत राहते.

एका संशोधनानुसार, भारतात सुमारे 30 टक्के तरुणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यापैकी 34 टक्के व्यक्ती शहरी भागांत तर 28 टक्के व्यक्ती ग्रामीण भागांत राहतात. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये उच्च रक्तदाबाचे शक्यता 3 टक्के अधिक असते. दरम्यान, पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास उच्च रक्तदाब कमी करता येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

उच्च रक्तदाब म्हणजे काय ?

उच्च रक्तदाब म्हणजे, हृदय आपल्या शरीरभोवती गरजेपेक्षा अधिक वेगाने रक्त पंप करतं. अधिक वेगाने आलेलं हे रक्तं रक्तवाहिन्यांमधून जाण्यासाठी हृदय , मेंदू, किडनी , डोळे आणि शरीराच्या इतर अवयवांवर अतिरिक्त दबाव पडतो. उच्च रक्तदाबामुळे अनेक आजार होऊ शकतात.

– हदयविकाराचा झटका – हृदयाशी संबंधित आजार – स्ट्रोक – धमन्यांचा आजार – डिमेन्शिया – किडनीचा आजार.

उच्च रक्तदाबाचा त्रास असाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यासही उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होऊ शकतो.

किती पाणी पिणे गरजेचे ?

‘दि मिररनुसार’, डॉ. मोनिका वासरमॅन (Dr. Monika Wassermann)यांच्या सांगण्यानुसार, ‘ न्युट्रिशनिस्ट असल्यामुळे मी माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देते. खरंतर, पाण्यामुळे तुमच्या रक्ताचे डिटॉक्सीफिकेशन ( टॉक्सिन्स बाहेर टाकणे), होण्यास मदत होते. तसेच अतिरिक्त प्रमाणातील सोडियमही बाहेर टाकले जाते. सोडियममुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. ‘ बऱ्याच लोकांना हेही माहीत नसेल, की क्रॅनबेरी ज्यूस प्यायल्यानेही उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. क्रॅनबेरी ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी (C) मोठ्या प्रमाणात असते. त्यामधील ॲंटी- ऑक्सीडेंट्समुळे सूज कमी होते, रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्त वाहिन्यांना आराम मिळतो. या सर्वामुळे रक्तदाबाची पातळी कमी होते, असेही त्यांनी सांगितले. जर तुम्ही रोज 8 ग्लास पाणी पीत असाल तर 24 तासांत तुम्ही किमान 2 लीटर पाणी प्याल. यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते.

खाण्याकडेही लक्ष द्या

डॉ. मोनिका वासरमॅन यांच्या सांगण्यानुसार, असे अनेक पदार्थ आहेतत, जे उच्च रक्तदाब कमी करण्यात मदत करतात. सॅलमन, ट्युना, ट्राऊट , सॅर्डिन, हेरिंग आणि मॅकरेल सारखे मासे खाल्ले पाहिजेत. त्यामध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

नॅशनल हेल्थ सर्व्हिस नुसार, या लोकांना उच्च रक्तदाबाचा (हाय ब्लड प्रेशर) धोका अधिक असतो . – ज्यांचे वजन अधिक असते. – जे जास्त मीठ खातात. – ज्यांच्या आहारात फळं आणि भाज्यांच्या समावेश नसतो. – जे पुरेसा व्यायाम करत नाहीत. – जे खूप जास्त मद्यपान करतात अथवा खूप कॉफी पितात. – जे पुरेशी झोप घेत नाहीत. – ज्यांचे वय 65 पेक्षा अधिक आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.