Tea Bag ने करताय दिवसाची सुरूवात? व्हा सावध, बनू शकता ‘या’ गंभीर आजाराचे रुग्ण !

टी बॅगचा वापर करून तयार केलेला चहा तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. टी बॅगमुळे काय नुकसान होऊ शकते, जाणून घेऊया.

Tea Bag ने करताय दिवसाची सुरूवात? व्हा सावध, बनू शकता या गंभीर आजाराचे रुग्ण !
| Updated on: Nov 24, 2022 | 4:16 PM

नवी दिल्ली – आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दिवसाी सुरुवात करताना चहा (drinking Tea in morning) पिण्याची सवय असते. मात्र काही जणांना त्याची इतकी सवय लागते की, कधी चहा न प्यायल्यास डोकेदुखीही सुरू होते. चहा पिण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी दुधाचा चहा पितात, तर कोणी ब्लॅक टी (black tea) . त्याशिवाय काही लोकांना टी बॅगचा चहा प्यायची सवय असते. मात्र टी बॅगचा (using tea bag) वापर करून तयार केलेला चहा तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? या संदर्भात एका संशोधनातून महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. टी बॅगमुळे होणारे नुकसान याबद्दल यापूर्वीही काही माहिती समोर आली होती. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

टी बॅगमध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो का?

मॉन्ट्रियलमधील मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या अनेक संशोधकांना संशोधनात असे आढळले आहे की प्लास्टिकच्या टी बॅगच्या पिशव्यांमधून चहाच्या कपांमध्ये अनेक हानिकारक उत्पादने जोडली अथवा मिसळली जातात. या संशोधनानुसार, 5 मिमीपेक्षा कमी प्लास्टिकच्या चहाच्या पिशव्या (tea bag) काही काळ गरम पाण्यात ठेवल्या जातात, यापैकी बरेच मायक्रोप्लास्टिक्स आणि नॅनोप्लास्टिक चहाच्या कपांमध्ये मिसळतात. हे हानिकारक पदार्थ गरम पाण्याच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

या केमिकलने तयार होते टी बॅग !

खरं पहायला गेलं तर टी बॅग ही एपिक्लोरोहाइड्रिन या नावाच्या केमिकलपासून तयार केली जाते. या संशोधनानुसार, टी बॅगचा कागद (चहासाठीच्या गरम पाण्यात) विरघळून जाऊ नये यासाठी टी बॅगमध्ये हे केमिकल वापरले जाते. टी बॅगचा वापर केल्यानंतर हे केमिकल पाण्यामध्ये आढळते व त्यामुळे शरीरात कॅन्सर होऊ शकतो. नफ्याच्या मागे लागत लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा व्यवसाय आज खूप मोठा झाला आहे. या केमिकलमुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे पीसीओडी आणि वंध्यत्व यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

या पर्यायांचा करा वापर

जर तुम्हाल सकाळची सुरूवात चहाने करायची असेल तर टी बॅगऐवजी चहाची पाने किंवा चहा पावडर यांचा वापर करावा. बाजारात तुम्हाला अशी उत्पादने अगदी सहज विकत मिळतील. यामुळे तुमची (चहा प्यायची) इच्छाही पूर्ण होईल व आरोग्याचे नुकसानही होणार नाही.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)