AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचे तोंड वारंवार कोरडे पडतंय? होऊ शकतात हे 5 गंभीर आजारांची लक्षणे, जाणून घ्या

उन्हाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते. त्यामुळे लोकं नियमित पाणी पितात. त्याचसोबत फळांच्या ज्यूसचाही आधार घेतात. पण बऱ्याचदा आपले तोंड कोरडे पडते. अशावेळी थोडे पाणी प्यायल्याने बरे वाटते. मात्र पाणी पीत असाल आणि तरीही तुमचे तोंड वारंवार कोरडे पडत असेल तर ही काळजी करण्यासारखी बाब आहे. कारण हे अनेक मोठ्या आजारांचे लक्षण असू शकतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण याविषयी जाणून घेऊयात.

तुमचे तोंड वारंवार कोरडे पडतंय? होऊ शकतात हे 5 गंभीर आजारांची लक्षणे, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Apr 30, 2025 | 7:14 PM
Share

उन्हाळ्याच्या दिवसात योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि आपले तोंड कोरडे पडते. बऱ्याचदा लोकांना खूप तहान लागते आणि ते वारंवार पाणी पितात. पण तरीही त्यांचे तोंड कोरडे पडते. या गोंष्टींकडे लोकं अनेकदा दुर्लक्ष करतात आणि त्यांना वाटते की ही ए‍‍क सामान्य समस्या आहे. मात्र वारंवार तोंड कोरडे पडणे ही एखाद्या गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात, म्हणूनच आपण या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. कारण या लक्षणांनी आपल्या शरीरात कोणते आजार उद्भवू शकतात, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. तर आजच्या या लेखात आपण वारंवार तोंड कोरडे पडल्याने कोणते गंभीर आजार होऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.

मधुमेह

तुम्हाला सुद्धा वारंवार तहान लागत असेल आणि तोंड कोरडे पडत असेल तर हे मधुमेह आजाराचे लक्षण असू शकतात. कारण मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिनचा अयोग्य वापर झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. आजकाल या आजाराने ग्रस्त लोकं आपल्याला प्रत्येक घरात आढळतात.

थायरॉईड विकार

हायपोथायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉईडीझम सारख्या थायरॉईड विकारांमुळे पाणी पिऊनही तोंड वारंवार कोरडे पडू शकते. कारण आपल्या शरीरातील चयापचय नियंत्रित करण्यात थायरॉईड ग्रंथी महत्त्वाची भूमिका बजावते.

किडनीचा आजार

किडनीचा आजार म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज किंवा क्रॉनिक किडनी फेल्युअर म्हणजेच किडनीचे कार्य हळूहळू कमी होणे. ज्या लोकांचे तोंड कोरडे पडते आणि सतत तहान लागते, त्यांचबरोबर थकवा, सूज, लघवीमध्ये बदल आणि वजन कमी होणे, हे या आजाराची लक्षणे आहेत. कारण किडनीचा आजार असल्यास तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकू शकत नाहीत. यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.

एचआयव्ही/एड्स

एचआयव्ही/एड्स हा एक आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे तोंड कोरडे पडण्याची समस्या उद्भवू शकते. या आजारामुळे शरीराला अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे तुमचे तोंड वारंवार कोरडे पडत असेल तर वेळीच खबरदारी घेऊन योग्य उपचार करणे गरजेचे आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.