AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ पाच खाद्यपदार्थ खा आणि मायग्रेनचा त्रास दूर करा; जाणून घ्या गुणकारी खाद्यपदार्थ

खाद्य पदार्थ आपल्या मायग्रेनचा त्रास कायमचा दूर करू शकत नाही, परंतु निश्चितपणे वेदनांचा प्रभाव कमी करण्यामध्ये मदत करतील. मायग्रेन एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे.

'हे' पाच खाद्यपदार्थ खा आणि मायग्रेनचा त्रास दूर करा; जाणून घ्या गुणकारी खाद्यपदार्थ
'हे' पाच खाद्यपदार्थ खा आणि मायग्रेनचा त्रास दूर करा; जाणून घ्या गुणकारी खाद्यपदार्थ
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 8:06 AM
Share

मुंबई : मायग्रेन हा देखील डोकेदुखीचाच एक भाग आहे. या डोकेदुखीमध्ये आपल्याला प्रचंड वेदना होतात. या वेदनांपासून आपल्याला कायमचा आराम कसा मिळेल, या विचारात तुम्ही असाल. तुम्ही मायग्रेनमुळे नैराश्यात वावरत असाल. पण, तुम्हाला आता या त्रासापासूनही आराम मिळू शकतो. काही जीवनशैलीची सवय आणि आरोग्यदायी आहार तुम्हाला अशा प्रकारच्या डोकेदुखीपासून चांगला आराम मिळवून देऊ शकतात. (Eat these five foods and relieve migraine; know about healthy foods)

काही खाद्यपदार्थ असे आहेत कि ते मायग्रेनचा त्रास वाढवण्यास कारणीभूत असतात, तर काही खाद्यपदार्थ मानसिक त्रास रोखण्यास मदत करू शकतात. खाद्य पदार्थ आपल्या मायग्रेनचा त्रास कायमचा दूर करू शकत नाही, परंतु निश्चितपणे वेदनांचा प्रभाव कमी करण्यामध्ये मदत करतील. मायग्रेन एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ही स्थिती जीनमधून दिसू शकते किंवा तणाव आणि हार्मोन ही मायग्रेनची करणे असू शकतात.

मायग्रेनवर उपायकारी असे खाद्यपदार्थ

सॅल्मन

ओमेगा -3 फॅटी अॅसिडवाला फिश अशी ओळख असलेला सॅल्मन नावाचा मासा मायग्रेनने त्रस्त असलेल्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. मायग्रेनचा त्रास कमी करण्यास सॅल्मनची चांगली मदत होते.

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्समध्ये मॅग्नीशियम आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक तत्वे तसेच न्यूट्रिएंट्स भरपूर असतात. ड्रायफ्रूट्स हे आपल्या शरीराबरोबरच मायग्रेनच्या त्रासावर उपचार म्हणूनदेखील उपयुक्त आहेत. ड्रायफ्रूट्सचे सेवन आरोग्यदायी स्नॅक म्हणूनही करू शकता. आपल्या बॅगमध्ये ड्रायफ्रूट्स सोबत ठेवा. तुमचा मायग्रेनचा त्रास ड्रायफ्रूट्स खाऊन कमी होऊ शकतो.

पालक

मायग्रेनवर हिरव्या आणि पत्तेदार भाज्या विशेष फायदेशीर असतात. पालक फोलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी तसेच मॅग्नीशियमचा एक चांगला स्रोत आहे. मायग्रेनशी लढण्यास पालकची मदत होते.

ओट्स

ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी ओट्सची फार मदत होते. मायग्रेनने त्रस्त असलेल्या लोकांसाठी ओट्स फायदेशीर आहे. तुम्ही दररोज नाश्त्याच्या रूपात ओट्स खाऊ शकता. यासोबत तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला केवळ ओट्स खाताना येणारा कंटाळा दूर होईल.

पाणी

सध्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रचंड दगदग, तितकाच ताणतणाव आहे. त्यामुळे अनेकांना डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास जाणवत आहे. तुम्ही मायग्रेनचा त्रास घालवण्यासाठी पाणी अधिक प्रमाणात प्या. हा एक प्रभावी उपाय ठरू शकेल. दिवसभरात कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. (Eat these five foods and relieve migraine; know about healthy foods)

इतर बातम्या

मिरजेत नशेबाज तरुणांचा हैदोस सुरुच, ऑईल टँकरची काच फोडली, वाहकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

मुंडे भगिनी समर्थकांचे राजीनामासत्र सुरुच, भाजप भटक्या विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र सरचिटणीसांचाही रामराम

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.