AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Piles Problem: मूळव्याधाचा त्रास सतावतोय ? ‘हे’ पदार्थ जरूर खा

मूळव्याधाचा त्रास असल्यास त्या व्यक्तीला खूप वेदना सहन कराव्या लागतात. खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतल्यास हा त्रास दूर होऊ शकतो.

Piles Problem: मूळव्याधाचा त्रास सतावतोय ? 'हे' पदार्थ जरूर खा
| Updated on: Nov 16, 2022 | 1:23 PM
Share

नवी दिल्ली – मूळव्याध (Piles) हा एक गंभीर आजार असून यामध्ये पीडित व्यक्तीच्या मलाशयाला सूज येते व खूप वेदना सहन कराव्या लागतात. याचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे अंतर्गत मूळव्याध व दुसरा हा बाह्य मूळव्याध होय. अंतर्गत मूळव्याधात मलासोबत रक्त येते व बाह्य मूळव्याधात गुदद्वाराभोवती सूज येऊन तीव्र वेदना (pain) होते तसेच खाजही सुटते. तीव्र अतिसार किंवा बद्धकोष्ठता, धूम्रपान वा मद्यपान (smoking or drinking alcohol) करणे, शौचालयात बराच वेळ बसून राहणे, मलत्याग करताना जोर लावणे, वजन वाढणे, जड सामान उचलणे इत्यादी गोष्टी मूळव्याधासाठी कारणीभूत ठरू शकतात. खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतल्यास हा त्रास दूर होऊ शकतो.

मूळव्याधाचा त्रास असताना काय खावे ?

मूळव्याधाचा त्रास सुरूवातीच्या टप्प्यात असेल तर तो शस्त्रक्रियेविनाही बरा होऊ शकतो. मूळव्याधाच्या समस्येमध्ये फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा.

1) पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर पाणी हे त्या आजाराच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होत असेल तर दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे, कारण ते शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते. दिवसभरात किमान ३-४ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच मलत्याग करणेही सोपे होते. पाणी पिण्यासह तुम्ही सफरचंद, केळं, संत्र, काकडी, गाजर इत्यांदीचा ज्यूसही पिऊ शकता. हे खूप फायदेशीर ठरते.

2) संपूर्ण धान्य खावे संपूर्ण धान्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळते जे मूळव्याधात खूप फायदेशीर ठरते . मूळव्याधाचा त्रास असलेल्या रुग्णांनी ओट्स, ब्रराऊन राईस व गहू इत्यादी संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करावा, अशी सूचना डॉक्टर देतात. संपूर्ण धान्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

3) फळांचे सेवन उपयुक्त मूळव्याधाची लक्षणे कमी करण्यासाठी खूप फळांचे सेवन करणे हे खूप फायदेशीर ठरते . केळी, सफरचंद, द्राक्षे, संत्री यांचा आपल्या आहारात समावेश करता येईल. या फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात जी मूळव्याधाचा त्रास दूर करण्यास मदत करतात.

4) हिरव्या भाज्यांचे सेवन करा हिरव्या आणि पालेभाज्यांमध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स व मिनरल्स असतात ज्यामुळे मूळव्याधाची लक्षणे कमी होतात. पालक, गाजर, काकडी, कोबी आणि ब्रोकोली अशा हिरव्या भाज्या आणि पालेभाज्यांचे सेवन तुम्ही करू शकता.

5) ताक पिण्याने मिळतो आराम ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो, त्यामुळे उत्तेजित झालेल्या नसा शांत होतात. ताक हे आपल्या शरीरातील सूज तसेच इन्फेक्शन दूर करण्यास मदत करते. ताकाचे नियमितपणे सेवन केल्यास मूळव्याधाची लक्षणे प्रभावीपणे कमी होऊ शकतात.

6) हर्बल चहा ठरतो उपयोगी मूळव्याधाचा त्रास असेल तर हर्बल चहा पिणे हे खूप उपयुक्त ठरते. हर्बल चहाचे सेवन केल्याने सूज कमी होते तसेच मलत्याग करताना होणारा रक्तस्त्राव कमी होतो. बाजारात हर्बल टीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही हर्बल टी निवडू शकता.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?