Health Care : जाणून घ्या गरोदरपणात चणे खाण्याचे फायदे आणि तोटे!

चणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत. चण्यामध्ये लोह, प्रथिने, कॅल्शियम, फायबर, फोलेट आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने रोज चणे खाल्ल्यास त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता होत नाही.

Health Care : जाणून घ्या गरोदरपणात चणे खाण्याचे फायदे आणि तोटे!
गर्भधारणा
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 10:01 AM

मुंबई : चणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत. चण्यामध्ये लोह, प्रथिने, कॅल्शियम, फायबर, फोलेट आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने रोज चणे खाल्ल्यास त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. म्हणून, गर्भवती महिलांसाठी देखील हे खूप चांगले मानले जाते.

गर्भवती महिलांना सामान्य लोकांपेक्षा अधिक पोषक तत्वांची आवश्यकता असते. कारण त्यांना त्यांच्यासोबत गर्भाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. याशिवाय गरोदरपणात हार्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना बद्धकोष्ठता, गॅस, मळमळ आदी समस्यांनाही सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत गरोदर महिल्यांनी चणे खाण्याचे कोणते फायदे आणि तोटे आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.

-गर्भधारणेदरम्यान महिलांना खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. चण्याच्या सेवनाने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. यामुळे ताजेपणा जाणवतो आणि आराम वाटते.

-बहुतेक स्त्रिया गरोदरपणात बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत चणे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. चण्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे त्याचे सेवन बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करते.

-सुमारे 65 ते 75 टक्के महिला गरोदरपणात अशक्तपणाची तक्रार करतात. चण्यामध्ये भरपूर लोह असते, जे शरीरातील रक्त पातळी वाढवण्यास मदत करते आणि अॅनिमियापासून बचाव करते.

-गर्भधारणा मधुमेहाचा धोका देखील असतो. अशा स्थितीत चण्याचे सेवन अत्यंत उपयुक्त ठरते. चणामध्ये प्रतिरोधक स्टार्च आणि अॅमायलोज असते, जे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढण्यास प्रतिबंध करते. यामुळे मधुमेहाच्या धोक्यापासूनही संरक्षण मिळते.

-गर्भधारणेदरम्यान बऱ्याच महिलांना ऍलर्जी होते. अशा स्थितीत चणे खाऊ नये. चण्यामुळे अॅलर्जीची समस्या आणखी वाढू शकते. चण्यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे ही समस्या वाढू शकते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.