AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा आणि बरंच काही… योग्य नाही ! चहासोबत हे पदार्थ खाल्याने आयुष्यभर झेलावा लागेल ॲसिडिटीचा त्रास

सध्याच्या व्यस्त जीवनात लोक त्यांच्या आरोग्याकडे कमी लक्ष देतात. चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडू लागते. अनेक वेळा लोक चहासोबत काहीही खातात, पण त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

चहा आणि बरंच काही... योग्य नाही ! चहासोबत हे पदार्थ खाल्याने आयुष्यभर झेलावा लागेल ॲसिडिटीचा त्रास
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 06, 2023 | 9:38 AM
Share

नवी दिल्ली – आपल्यापैकी बहुतेक लोकांना चहा (Tea) प्यायला आवडतो. असे बरेच लोक आहेत ज्यांना चहासोबत काहीतरी खायला आवडते. लोक अनेकदा चहासोबत पराठे, पुरी, पकोडे, समोसे, स्नॅक्स किंवा बिस्किटे (tea and snacks) खातात. अनेकांना चहाचं एवढं व्यसन असतं की त्यांना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातही चहाचा घोट प्यायला आवडतो. पण चहासोबत काहीतरी स्नॅक्स खाण्याच्या सवयीमुळे तुमचे आरोग्य (side effect on health) बिघडू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ?

आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा चहासोबत अशा गोष्टी खातो ज्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. चहासोबत चुकीचे पदार्थ खाल्ल्याने आपले लिव्हर खराब होऊ शकते आणि तुम्हाला आयुष्यभर ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. चांगल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी, तुम्ही चहासोबत काही पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे.

चहा आणि फ्रेंच फ्राईज : बर्‍याच लोकांना चहासोबत फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा किंवा भजी खायला आवडते. पण, तुम्हाला माहित आहे का, की या पदार्थांच्या सेवनाने आपल्या लिव्हरवर खूप वाईट परिणाम होतो. हे सर्व पदार्थ फॅटने भरलेले असतात, जे पचवण्यासाठी लिव्हरला खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यामुळे लिव्हरचे आयुष्य कमी होऊ शकते.

मीठयुक्त पदार्थांचे अतीसेवन : चहासोबत मीठयुक्त पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. चहासोबत जास्त मीठ असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात पाणी टिकून राहण्याची समस्या निर्माण होऊ शकते. चिप्स, स्नॅक्स किंवा बिस्किटे यासारखे कॅनमधील किंवा पॅकबंद पदार्थांचे सेवन केल्याने फॅटी लिव्हर रोग आणि लठ्ठपणाची समस्या वाढू शकते.

चहा आणि ब्रेड : बहुतेक लोकांना ब्रेकफास्टमध्ये चहासोबत ब्रेड टोस्ट किंवा ब्रेड बटर खायला आवडतं. पण रोजची ही सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. चहासोबत ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते आणि त्याचबरोबर फॅटी लिव्हर डिसीजची समस्याही उद्भवते.

हिरव्या भाज्यांचे पदार्थ चहासोबत खाणे हानिकारक : पराठे, भजी यांसारखे भाज्यांपासून बनवलेले पदार्थ सेवन करताना चहा पिणे हानिकारक आहे. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने लिव्हरला ते पचवण्यास त्रास होतो, ज्यामुळे पोटाशी संदर्भात समस्या उद्भवू शकते.

हळदीचे सेवन : हळद कधीही चहासोबत सेवन करू नये. हळदीचे गुणधर्म चहावर प्रतिक्रिया देऊ शकतात आणि पोटाला हानी पोहोचवू शकतात. या दोन्हींचे एकत्र सेवन केल्याने ॲसिडिटी व ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.