AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ गोष्टी खाल्ल्याने शुक्राणूंचा होईल ऱ्हास..तुम्ही पिता हेाऊ शकणार नाहीत; चांगल्या वैवाहिक आयुष्यासाठी आज पासूनच घ्या काळजी!

पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता का घसरते? ही खरोखरच मोठी समस्या आहे का? शुक्राणूंची संख्या कमी होण्यास आपण खातो ते अन्न जबाबदार आहे का? आज आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टींची उत्तरे देणार आहोत. जाणून घ्या, कोणत्या गोष्टी पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी करत आहेत, ज्यामुळे बहुतेक पुरुषांना पिता बनण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.

‘या’ गोष्टी खाल्ल्याने शुक्राणूंचा होईल ऱ्हास..तुम्ही पिता हेाऊ शकणार नाहीत; चांगल्या वैवाहिक आयुष्यासाठी आज पासूनच घ्या काळजी!
Sperm cellImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 07, 2022 | 4:57 PM
Share

मुंबई : गेल्या काही वर्षांत पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या सातत्याने कमी-कमी होत आहे. यामागील कारणे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात, विशेषतः पुरुष शुक्राणूंच्या आरोग्याकडे (Towards sperm health) फारसे लक्ष देत नाहीत. आहार आणि जीवनशैलीमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते याची कल्पनाही बहुतेक पुरुषांना नसते. शुक्राणूंची संख्या कमी होणे ही, खरोखरच एक मोठी समस्या आहे. गेल्या ३८ वर्षांत पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या ५९ टक्क्यांनी कमी झाल्याचे एका अभ्यासात (In one study) आढळून आले आहे. शुक्राणूंची संख्या कमी असल्याने याचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही (Also on fertility) परिणाम होतो, त्यामुळे बहुतेक जोडप्यांना मूल होण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागचे कारण काय आहे हे शोधणे फार कठीण आहे. याविषयी पुर्वी अनेक मते मांडली गेली आहेत. शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे, उशिरापर्यंत कार्यालयीन काम करणे, मोबाईलचा अधिक काळ वापर करणे इत्यादी कारणे आतापर्यंत समोर आली आहेत.

या पदार्थांचा होतो वाईट परिणाम

  1. प्रक्रिया केलेले मांस- अशा अनेक अभ्यासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये हॉट डॉग, सलामी, बीफ, बेकन इत्यादींचा समावेश होतो. या गोष्टी खायला खूप छान लागत असल्या तरी आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतात. अनेक अभ्यासामध्ये असे सांगितले गेले आहे की प्रक्रिया केलेले लाल मांस खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते तसेच शुक्राणूंची हालचाल कमी होते.
  2. ट्रान्स फॅट- ट्रान्स फॅटमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. 2011 मध्ये झालेल्या स्पॅनिश अभ्यासात असे समोर आले आहे की शरीरात ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असल्याने शुक्राणूंची संख्या कमी होऊ लागते.ट्रान्स फॅटमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. शरीरात ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असल्याने शुक्राणूंची संख्या कमी होऊ लागते.
  3. सोया उत्पादने- सोया उत्पादनांमध्ये फायटोएस्ट्रोजेन असतात – इस्ट्रोजेन सारखी संयुगे जी वनस्पतींमधून येतात. बोस्टनमधील फर्टिलिटी क्लिनिकमध्ये 99 पुरुषांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की सोया उत्पादनांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते. जास्त फॅट डेअरी उत्पादने- दूध तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते परंतु शुक्राणूंचा समावेश त्यात करता येणार नाही. उच्च चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची हालचाल कमी होते आणि शुक्राणूंच्या आकारात असमानता येते, असे एका अभ्यासात समोर आले आहे.
  4. या 3 गोष्टी पुरुष प्रजनन क्षमता वाढवितात मासे- ओमेगा-३ फॅटी अॅसिड माशांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. म्हणून तुम्ही लाल किंवा प्रक्रिया केलेल्या मांसाऐवजी मासे खाऊ शकता. फळे आणि भाज्या- एका प्रजनन क्लिनिकमध्ये 250 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की ज्यांनी जास्त प्रमाणात फळे आणि भाज्या, विशेषतः: हिरव्या भाज्या आणि सोयाबीनचे सेवन केले, त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून आले. तसेच, अशा पदार्थांचे सेवन न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत या लोकांमध्ये शुक्राणूंची गतिशीलता वाढली होती.
  5. हे आश्चर्यकारक नाही कारण वनस्पतींमधील प्रत्येक गोष्ट को-एंझाईम Q10, व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन यांसारख्या अँटी-ऑक्सिडंटमध्ये आढळते. शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी हे सूक्ष्म पोषक घटक अतिशय फायदेशीर मानले जातात.
  6. अक्रोड – वर्ष 2012 मध्ये केलेल्या अभ्यासात 21 ते 35 वर्षे वयोगटातील 117 पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. सर्व पुरुषांना 12 आठवडे दररोज खाण्यासाठी सुमारे 18 अक्रोड देण्यात आले. संशोधनात, अक्रोड खाल्ल्याने पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये सुधारणा दिसून आली. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळते. ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् अंडकोषांमध्ये रक्त परिसंचरण सुधारतात, ज्यामुळे वीर्याचे प्रमाण आणि उत्पादन दोन्ही वाढते.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.