AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जास्त मासे खाणाऱ्यांना होऊ शकतो ‘स्कीन कॅन्सर’;जाणून घ्या, कोणते मासे असतात अधिक घातक.. किती प्रमाणात खावे मासे

मांसाहार करणाऱ्या लोकांच्या आहारात अंडी, चिकन, मटण, मासे इत्यादींचा समावेश होतो. त्यापैकी सर्वाधीक प्रथिने (Most protein) मासेमध्ये आढळतात. तज्ज्ञांच्या मते, मासे खाल्ल्याने शरिरासाठी अनेक फायदे होतात, परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, मासे खाल्ल्याने एखाद्या गंभीर आणि प्राणघातक आजाराचा (Of a terminal illness) धोका वाढू शकतो. अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरण त्वचेच्या पेशींच्या […]

जास्त मासे खाणाऱ्यांना होऊ शकतो ‘स्कीन कॅन्सर’;जाणून घ्या, कोणते मासे असतात अधिक घातक.. किती प्रमाणात खावे मासे
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 04, 2022 | 3:55 PM
Share

मांसाहार करणाऱ्या लोकांच्या आहारात अंडी, चिकन, मटण, मासे इत्यादींचा समावेश होतो. त्यापैकी सर्वाधीक प्रथिने (Most protein) मासेमध्ये आढळतात. तज्ज्ञांच्या मते, मासे खाल्ल्याने शरिरासाठी अनेक फायदे होतात, परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, मासे खाल्ल्याने एखाद्या गंभीर आणि प्राणघातक आजाराचा (Of a terminal illness) धोका वाढू शकतो. अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरण त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान करतात, ज्यामुळे बहुतेकांना स्कीन कॅन्सर (Skin cancer) संभवतो. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, मासे खाल्ल्याने ‘मेलेनोमा’ चा धोका वाढू शकतो, जो एक प्रकारचा कर्करोग आहे. ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असे आढळून आले की, जे लोक दर आठवड्याला 300 ग्रॅम मासे खातात त्यांना प्राणघातक ‘मेलेनोमा’चा धोका 22 टक्के जास्त असतो. या संशोधनात ६२ वर्षे वयाच्या ४ लाख ९१ हजार ३६७ प्रौढांनी भाग घेतला. त्यांच्याकडून मासळीच्या सेवनाबाबत माहिती घेण्यात आली. या संशोधनात सहभागी लोकांनी गेल्या वर्षी तळलेले मासे, भाजलेले मासे किंवा ‘टूना फिश’ खाल्ले होते.

यांना असतो जास्त धोका

संशोधनात वाढलेले वजन, धूम्रपान, मद्यपान, आहार, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास, अतिनील किरणोत्सर्गाचे संपर्क यासारख्या डेटावर परिणाम करणारे घटक विचारात घेतले. निष्कर्षांमध्ये असे आढळून आले की, 1 टक्के लोकांना मेलेनोमाचा धोका वाढला आहे. तर, 0.7 टक्के लोकांना मेलेनोमाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या लोकांमध्ये माशांचे अतिरिक्त सेवन त्वचा कर्करोगाच्या जोखिमशी संबंधित होते.

टुना फिश अधिक घातक

इतर संशोधनात, ज्या लोकांनी तळलेल्या माशाशिवाय शिजवलेले मासे खाल्ले, त्या लोकांमध्ये ‘मेलेनोमा’चा धोका 18 टक्के जास्त आढळला. टुना फिश खाणाऱ्यांमध्ये मेलेनोमाचा धोका 20 टक्के जास्त होता. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तळलेले मासे खाल्लेल्यांमध्ये कॅन्सरचा धोका नव्हता.

काळ्या त्वचेच्या लोकांना कमी धोका

संशोधक लेखक Eunyoung Cho यांच्या मते, मेलेनोमा हा युनायटेड स्टेट्स मधील पाचवा सर्वात सामान्य कर्करोग आहे. आणि मेलेनोमा विकसित होण्याचा धोका गोरी त्वचा असलेल्या 38 लोकांपैकी एक आणि सावळी(काळसर) त्वचा असलेल्या 1,000 लोकांपैकी एक आहे. गेल्या काही दशकांमध्ये माशांचा वापर वाढल्यामुळे आम्ही हे संशोधन केल्याचे त्यांनी सांगीतले. युन्योंग चो पुढे म्हणाले की, इतर अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक मासे खातात त्यांच्या शरीरात पारा आणि आर्सेनिक सारख्या जड धातूंचे प्रमाण जास्त असते. ते त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढवू शकतात. या नवीन संशोधनामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. आम्ही लोकांना मासे खाण्यापासून रोखत नाही, पण संशोधनात जे सिद्ध झाले आहे ते सांगत आहोत. असे त्यांनी ते नमुद केले. याबाबत आजतक हिंदीने सविस्तर वृत्त प्रसारीत केले आहे.

Follow Us
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक