AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईअरफोन लावून सतत गाणी ऐकता ? आजच सोडा ही सवय, नाहीतर गाणी काय, काहीच ऐकू येणार नाही…

गेल्या 10 वर्षात पोर्टेबल इअरफोन्सद्वारे मोठ्या आवाजात संगीत ऐकण्याचे अनेक परिणाम दिसून आले आहेत. लोक हेडफोनला तासन्तास चिकटून राहतात ही चिंताजनक बाब आहे.

ईअरफोन लावून सतत गाणी ऐकता ? आजच सोडा ही सवय, नाहीतर गाणी काय, काहीच ऐकू येणार नाही...
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 06, 2023 | 1:48 PM
Share

नवी दिल्ली – आजकाल बहुतेक लोक आजूबाजूचा आवाज टाळण्यासाठी किंवा फॅशनेबल दिसण्यासाठी हेडफोन (headphones) वापरतात. ऑफिसला किंवा कॉलेजला जाताना, प्रवास करताना, किंवा एखादं काम करतानाही हेडफोन किंवा इअरफोन हा प्रत्येक व्यक्तीचा सोबती असतो. हेडफोन कानावर लावल्याने बाह्य आवाजापासून संरक्षण होते, हे जरी खरं असलं तरी त्याचा अतिवापर आपल्या कानांसाठी अतिशय हानिकारक (harmful for ears) ठरू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हीही तासन्तास हेडफोन्स वापरत असाल तर सावध व्हा. कारण त्याच्या अतिवापराने कानावर (bad effects on ears) तर वाईट परिणाम होतातच पण शरीराचेही गंभीर नुकसान होऊ शकते.

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, इअरफोन किंवा हेडफोन शरीराचे नुकसान होते, ते एक वाईट व्यसन आहे. इअरफोन्समधून येणाऱ्या आवाजामुळे तुमच्या कानाच्या पडद्यावर मोठा परिणाम होतो, तसेच कायमचे नुकसानही होऊ शकते. गेल्या 10 वर्षात पोर्टेबल इअरफोन्सद्वारे मोठ्या आवाजात संगीत ऐकण्याचे अनेक परिणाम दिसून आले आहेत. लोक हेडफोनला तासन्तास चिकटून राहतात ही चिंताजनक बाब आहे.

हेडफोन किंवा इअरफोनच्या अतिवापराचे दुष्परिणाम

1) बहिरेपणा

इअरफोन किंवा हेडफोनने मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कानांची ऐकण्याची क्षमता फक्त 90 डेसिबल आहे, जी सतत ऐकून 40-50 डेसिबलपर्यंत कमी होऊ शकते.

2) हृदयविकाराचा धोका

तज्ज्ञांच्या मते, हेडफोन लावून तासनतास गाणे ऐकणे कानांसाठी तसेच हृदयासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे हृदयाची धडधड वेगाने होते, तसेच हृदयाचे खूप नुकसान होऊ शकते.

3) डोकेदुखी

हेडफोन किंवा इअरफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या उद्भवते. बऱ्याच लोकांना झोपेचा त्रास, निद्रानाश, निद्रानाश किंवा अगदी स्लीप ॲपनियाचा त्रास होऊ शकतो.

4) कानात संसर्ग

इअरफोन थेट कानात लावला जातो, ज्यामुळे हवेच्या मार्गात अडथळा येतो. या अडथळ्यामुळे बॅक्टेरियाच्या वाढीसह विविध प्रकारचा संसर्ग होऊ शकतो.

5) स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये होते वाढ

हेडफोनचा दीर्घकाळ वापर केल्याने व्यक्तीच्या सामाजिक जीवन आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे ताण तसेच चिंताही वाढू शकते.

कसा करावा बचाव?

तुम्हालाही कानाला होणारा त्रास टाळायचा असेल, तर गरज असेल तेव्हाच इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करा. दिवसभरात 60 मिनिटांपेक्षा अधिक काळ इअरफोनचा वापर करू नये. ते धोकादायक ठरू शकते.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...