
मुंबई : सध्या सर्वत्र डोळ्यांची साथ (Eye Flu) आली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच वयोगटातील लोकं या संक्रमणामुळे बाधीत होत आहेत. रूग्णालयात या आजाराच्या रूग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ही समस्या डोळे लाल होण्यापासून सुरू होते. आणि त्यासोबतच डोळ्यात खाज सुटणे, दुखणे आणि कधी कधी सूज येणे देखील होते. आय फ्लू, ज्याला कंटंक्टिवाइटिस देखील म्हणतात, त्याच्या घटनेची तीन भिन्न कारणे असू शकतात. उपचार करण्याआधी डोळ्याच्या फ्लूचे सर्व प्रकार समजून घेणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती देखील जाणून घेणे आवश्यक आहे.
डोळ्याचा फ्लू फक्त एकाच प्रकारे होत नाही. डोळ्याच्या फ्लूचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. हा फ्लू देखील जीवाणूजन्य आहे. याशिवाय फ्लूच्या विषाणूमुळेही हा आजार होतो. काहींना या ऋतूत ऍलर्जीमुळे आय फ्लू होतो.
आय फ्लू टाळण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपले हात आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे. आय फ्लूचा संसर्ग हातांद्वारे सर्वाधिक पसरतो. म्हणूनच वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही आय फ्लू असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलात आणि त्याचे बळी ठरलात, तर सर्वप्रथम कुटूंबीयांच्या संपर्कात जाणे टाळा. काही काळ कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे थांबवा. काही दिवस लोकांमध्ये जाऊ नका. तसेच समारंभाला आणि गर्दिच्या ठिकाणी जाणे टाळा.
आय फ्लूचा उपचार हा कोणत्या प्रकारचा फ्लू आहे यावर अवलंबून असतो. जर हा व्हायरल आय फ्लू असेल, तर हा एक स्व-मर्यादित प्रकार आहे जो वेळेनुसार बरा होतो. पण त्यातही वेदना कमी करणारी आणि आवश्यक औषधे दिली जातात. जिवाणू आणि ऍलर्जीक आय फ्लूच्या तपासणीनंतर, त्याचे उपचार केले जातात. यासोबतच डोळ्यांना थंड शेक देतात.