AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eyes Care Tips | चष्मा लावण्यास टाळाटाळ? या गंभीर परिणामांसाठी तयार रहा

बघण्याची क्षमता कमी होत असताना डोळ्यांना वेळीच चष्मा लावला तर अनेक मोठे नुकसान टाळता येतात. परंतु अनेक लोक चष्मा लावण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. यातून डोळ्यांचे मोठे नुकसान होण्याचा धोका नाकारता येत नाही. या लेखात चष्मा न लावण्याचे तोटे सांगणार आहोत.

Eyes Care Tips | चष्मा लावण्यास टाळाटाळ? या गंभीर परिणामांसाठी तयार रहा
नंबर वाढल्यावर चष्मा घालण्यास टाळाटाळ नकोImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 10:09 AM
Share

मुंबई : डोळ्यांची दृष्टी कमी होणे किंवा डोळे कमकुवत (weak eyes) होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकस आहाराचा अभाव. लहानपणापासूनच मुलांना हिरव्या भाज्या व इतर आरोग्यदायी पदार्थ (Healthy foods) खाऊ घातल्यास त्यांचे डोळे कमजोर होत नाहीत. तसेच, तासंतास मोबाईल आणि टीव्ही पाहण्यानेही डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. डोळे कमकुवत झाल्यानंतर काही लोक चष्मा घालण्यास टाळाटाळ करतात असेही दिसून आले आहे. त्यांना चष्मा लावणे आवडत नाही त्याच प्रमाणे चष्मा (glasses) लावल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होईल, तसेच कमीपणाची भावना निर्माण होत असल्यानेही अनेक जण चष्मा लावण्यास टाळाटाळ करीत असतात. चष्मा लागेल म्हणून अनेज जण तर डोळ्यांची तपासणीदेखील करीत नाहीत. डोळ्यांची वर्षातून दोनदा तपासणी करावी, असे सांगितले जाते. कमकुवत डोळ्यांना वेळीच चष्मा लावला तर अनेक मोठे नुकसान टाळता येते.

डोळ्यात पाणी येणे

ज्या लोकांचे डोळे कमजोर असतात, त्यांना डोळ्यांत पाणी येण्याची समस्या सुरू होते. तज्ज्ञांच्या मते, कमजोरीमुळे डोळ्यांवर ताण येतो आणि अशा स्थितीत डोळ्यांमधून पाणी वाहू लागते. अशा समस्येला ‘रिफ्रेक्टिव एरर’ असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी रोज चष्मा लावावा, डॉक्टरांकडून नियमित उपचार घ्यावे.

डोळ्यांवर ताण

अनेकवेळा डोळ्यांना चष्मा लावण्याची आवश्‍यकता असूनही अनेकांकडून ते टाळले जात असते. लोक लॅपटॉप किंवा पीसीवर बराच वेळ काम करत असल्याने त्यांच्या डोळ्यांवर ताण निर्माण होतो. या चुकीमुळे त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चष्माचा वापर न केल्याने लहान मुलेही अभ्यासात नीट लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, त्यांना अक्षरे पाहण्यासाठी खूप कसरत करावी लागते, शिवाय यातून डोळ्यांवर ताणही निर्माण होत असतो.

डोकेदुखी

डोळे कमकुवत असतील आणि तरीही तुम्ही त्यांच्यावर जोर देत असाल तर याचा गंभीर परिणाम डोळ्यांसह आरोग्यावर होण्याचा धोका निर्माण होउ शकतो. डोळ्यांसोबतच तुम्हाला डोकेदुखीचाही त्रास होईल. डोकेदुखीचा परिणाम केवळ ऑफिस किंवा अभ्यासाशी संबंधित कामावर होणार नाही, तर झोपेवरही याचा परिणाम होईल. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर डोळ्यांनुसार चष्मा लावणे आवश्‍यक ठरते.

संबंधित बातम्या :

सुरमई अखियों में! तेजस्वी डोळ्यांसाठी खूप प्रयत्न करताय? मग बदामाच्या तेलाचा वापर नक्की करा…

डोळ्यातील पांढरा भाग वारंवार लाल होतोय? चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम!!

Eye Care : डोळ्यातून सतत पाणी येण्याची समस्या? मग ‘हे’ खास घरगुती उपाय करून पाहा!

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.