AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?

लिव्हर डॅमेज होण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे, लिव्हर हा अवयव अतिशय महत्वाचा असून त्याची योग्य काळजी घेतली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते.

Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
Fatty Liver Disease
| Updated on: Apr 10, 2026 | 10:59 PM
Share

Liver Cirrhosis : लिव्हर सिरोसिस ज्यास सर्वसाधारणपणे दारुशी संबंधित आजार मानला जात होता. मात्र, आता हा गंभीर आजार अजिबात दारु न पिणारे किंवा एकदम कमी दारु पिणाऱ्यांना देखील होत आहे. याचे मुख्य कारण दैनंदिन सवयी, आहार आणि वाढते वजन, डायबिटीज आणि दीर्घकाळ बैठे काम यांना म्हटले जात आहे.

सायलेंट किलर आजार

या आजाराला नेहमीच सायलेंट किलर म्हटले जात असते. कारण कोणत्याही मोठ्या लक्षणाशिवाय हा आजार हळूहळू शरीराला नुकसान पोहचवत असतो. जेव्हा याची लक्षणे स्पष्ट दिसतात तोपर्यंत लिव्हर खूप प्रमाणात डॅमेज झालेले असते. डॉ. वसीम यांनी या संदर्भात सांगितले आहे की सिरोसिस या आजाराला आधी मद्याशी जोडले जात होते. परंतू हा आजार आता लठ्ठपणा, अयोग्य डाएट, डायबिटीज आणि फॅटी लिव्हर सारख्या लाईफस्टाईल आजाराशी जोडला गेला आहे.

लिव्हर महत्वाचा अवयव असून त्याची काम जेवण पचवणे, टॉक्सिन्स ला फिल्टर करणे आणि मेटाबॉलिझ्म संतुलित राखण्यास मदत करणे असे आहे.मात्र,जेव्हा लिव्हरवर दबाव येतो. मग फॅट जमा होणे असो, इन्फेक्शन वा कोणा अन्य कारणाने यात हळूहळू स्कार टिश्यू बनू लागतात. त्यामुळे पुढे जाऊन सिरोसिसमध्ये परिवर्तन होते. सुरुवातीला लक्षणे कमी असल्याने कोण लक्ष देत नाही. कायम थकवा जाणवणे, भूक कमी लागणे, पोटात हलका त्रास, विनाकारण वजन कमी होणे. अनेक लोक याला तणाव किंवा झोपेच्या कमतरतेमुळे झालाय म्हणून लक्ष देत नाही. मात्र, हा आजार जेव्हा पोटात सूज, त्वचा वा डोळे पिवळे पडणे, वारंवार इन्फेक्शन होणे आणि कमजोरी होण्यापर्यंत जातो तेव्हा लोकांना कळते.

एक्सपर्ट काय म्हणतात ?

लिव्हर सिरोसिस केवळ एका अवयवाचा आजार नाही, संपूर्ण शरीरास प्रभावित करतो. डायजेशन, इम्युनिटी आणि ब्लड सर्क्युलेशन सर्वांवर याचा परिणाम होतो. जर वेळीच याला ओळखता आले तर स्थिती सांभाळता येते. यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट, अल्ट्रासाऊंड आणि फायब्रोसिस तपासणीत या आजाराचे निदान होते. सुरुवातीच्या स्टेजमध्ये लाईफस्टाईल बदल करुन डॅमेज भागाला वाचवणे किंवा अंशत: बरे करणे शक्य होते असे डॉ. शंकर कुमार गुप्ता यांनी म्हटले आहे.

भारतात वाढती प्रकरणे –

भारतात नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिसिजची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. शहरी भागात प्रत्येक तीन नागरिकांपैकी एकाला ही समस्या जाणवत आहे. त्यामुळे या हलके समजू नये. घरातील सकस आहार घेणे, रोज व्यायाम करणे, वजन आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये राखणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न खाणे, वेळोवेळी तपासणी करणे या सर्वांमुळे आजार पहिल्या टप्प्यात असेल तर वाचवता येते. जर आजार गंभीर स्वरुपाचा झाला तर इलाज करणे अवघड आणि महागडे होते. अनेक प्रकरणात लिव्हर ट्रान्सप्लांटचा हाच अखेरचा पर्याय ठरतो.

Follow Us
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विशेष लक्ष
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?
नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव; पूरात दिसल्या नाहीत
Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक...नेमकं काय घडलं?
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?