AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताप आल्याने गोळ्या खाल्ल्या अन्… पुढील क्षणात विपरीत घडलं; जेजुरी अपघाताबाबत हादरवणारी माहिती समोर

pune jejuri accident : पुण्याच्या जेजुरीत भीषण अपघाताची घटना घडली. या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ताप आल्याने गोळ्या खाल्ल्या अन्... पुढील क्षणात विपरीत घडलं; जेजुरी अपघाताबाबत हादरवणारी माहिती समोर
| Updated on: Jul 13, 2026 | 2:19 PM
Share

पुण्यातील जेजुरी-सासवड रस्त्यावर भीषण अपघातात 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ट्रक दिंडीला धडकल्याने भीषण अपघात झाला. या धडकेत 3 महिलांचा दुर्देवी मृत्यू झालाय. या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक केली आहे. अटक केल्यानंतर चौकशीत वेगळीच बाब समोर आली आहे. ताप आल्याने चालकाने अधिक प्रमाणात औषध घेतल्याची बाब समोर आली आहे. पोलीस अपघाताच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करत आहे.

जेजुरीत अपघातग्रस्त नागरिकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या जेजुरीमधील खासगी रुग्णालयात सहा जणांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. तर त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आलं आहे. जखमींची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी भेट घेतली.

जेजुरीमधील अपघातात मृत्यू पावलेल्या महिलांची नावे समोर आली आहे. नंदा पवार, माधवी सलगरे, राजश्री भोसले असे मृत महिलांची नावे आहेत. या महिलांच्या मृत्यूमुळे सांगलीत शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच सांगलीच्या कसबे डिग्रज गावात बंद पाळण्यात आला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ काय म्हणाले?

पुणे जिल्हा परिषद सीईओ गजानन पाटील यांनी या दुर्घटनेवर भाष्य केलं. गजानन पाटील म्हणाले, ‘अपघातातील जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर दोन गंभीर जखमी वारकऱ्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलीये. अपघातामागची कारणं आता शोधली जाणार आहेत. प्रथम जखमींवर उपचार करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणा तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत’.

पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती 

पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल म्हणाले, ‘ हा ट्रक नांदेडचा आहे. या ट्रकचा चालक हा 65-70 वर्षांचा आहे. बालाजी डग असे त्याचे नाव आहे. ताप आल्याने त्याने गोळ्या घेतल्या. झोप लागल्याने हा अपघात झाला. जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वारकऱ्यांना आवाहन आहे की, आपल्या दिंडीसोबतच चला. आपल्या लेनवर चाला. चालक फिट असला पाहिजे. आमच्या जबाबदाऱ्या अजून चांगल्या प्रकारे पार पाडू. काही वाहन देखील दुरुस्त नाहीत. आपल्याला जो मार्ग दिला आहे, त्यावरच चाला’.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश