सावधान! आरोग्य सांभाळा, डासांचा बंदोबस्त करा, मराठवाड्यात तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

औरंगाबादसह मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आदी जिल्ह्यांमध्येही वातावरणातील बदलांमुळे, डासांच्या प्रादुर्भावामुळे ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डेंग्यू मलेरियाची लक्षणं आढळून येत आहेत.

सावधान! आरोग्य सांभाळा, डासांचा बंदोबस्त करा, मराठवाड्यात तापाच्या रुग्णांत मोठी वाढ
औंरगाबाद व परिसरात ताप, अंगदुखी, सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ.

औरंगाबाद: शहरासह ग्रामीण भाग आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ताप, अंगदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा (Fever, cold, joint pain, body pain) अशी लक्षणं असलेल्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याचे आढळून आले आहे. लहान मुलांसह, मध्यमवयीन लोकांमध्ये ही लक्षणं आढळून येत आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयासह (Aurangabad Ghati Hospital) खासगी रुग्णालयांमध्येही ही लक्षणं आढळून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाल्याने आरोग्यावर हा परिणाम होत असल्याची माहिती आरोग्य तज्ञांनी दिली आहे. घाटी रुग्णालयात जालना, परभणी, बुलडाणा, जळगाव आदी आठ जिल्ह्यांमधून रुग्ण येत असतात. इथे लहान वयातील रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. तर मध्यमवयीनांमध्ये अर्थात 40 ते 60 वयोगटातील नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणावर ही लक्षणे जाणवत आहेत.

औरंगाबादेत प्रत्येक घरात रुग्ण- डॉ. रंजलकर

औरंगाबादचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष रंजलकर यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरात ताप आणि अंगदुखीची लक्षणं असलेला एक तरी रुग्ण प्रत्येक घरात आढळत आहे. या आजारात आधी रुग्णाचे लहान सांधे दुखू लागतात. नंतर ताप येतोय. हा ताप 4 ते 5 दिवस चालतोय. त्यातही हाता-पायांचे सांधे तीव्र वेदना देऊ लागतात. गेल्या काही दिवसांपासून ही लक्षणं आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

घाटीतही डेंग्यूचे रुग्ण वाढतायत – डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य

शहरातील घाटी रुग्णालयात तापेच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एरवी ठराविक औषधांचा डोस देऊन रुग्णांना घरी सोडलं जातं. मात्र तापेमुळे शरीरात इतरही लक्षणं दिसू लागल्याने रुग्णांना अॅडमिट करण्याची वेळ येत आहे. गेल्या आठवड्यात घाटीत 50 तापेचे रुग्ण अॅडमिट होते तर 18 जणांमध्ये डेंग्यूची लक्षणं पॉझिटिव्ह आढळली. लहान मुलांमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण जास्त आढळून येत आहे. घाटीतील रुग्णांची संख्याही अचानक वाढली आहे. यात डेंग्यू, चिकनगुनिया, टायफाइड, फ्लू आदी रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयातील वैद्यकीय विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली आहे.

वातावरण बदलाने आरोग्य धोक्यात

गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा परिसरात प्रचंड प्रमाणावर पाऊस होत आहे. काही मिनिटात धोधो पाऊस तर पुढच्याच काही मिनिटात कडक ऊन पडत आहे. वातावरणातील हा क्षणोक्षणी होणारा बदल आरोग्यावर विपरित परिणाम करणारा ठरत आहे. तसेच कुठे कुठे अतिवृष्टी होऊन घरात पाणी शिरले. विविध कॉलन्यांमध्येही पाणी साचून राहिले आहे. रस्त्यांतील खड्ड्यांत पावसाचे पाणी साठलेले आहे. नालेसफाई न झाल्याने त्यावरही डास आणि माश्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्राधान्याने डासांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत आहे. यासाठी वैयक्तिक स्तरावर पेस्ट कंट्रोलिंग करणे किंवा महापालिकेशी संपर्क साधून परिसरात डासांसाठीची फवारणी करून घेणे आवश्यक आहे.

कोणत्या तपासण्या केल्या जातात?

रुग्णांमध्ये ताप आणि अंगदुखीची लक्षणं आढळल्यास प्राथमिक स्तरावर सीबीसी ही रक्ततपासणी केली जाते. त्यातून रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कळून येते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने पहिल्या औषधांच्या डोसमध्येही ताप न उतरल्यास डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांची अँटिजन टेस्टही करण्याचा सल्ला डॉक्टरांमार्फत दिला जातो. अशा लक्षणांमध्ये रॅपिड मलेरिया टेस्टही सांगितली जाते.

आजारी न पडण्यासाठी काय काळजी घ्याल?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI