तुमच्याही ‘यूरिन’मधून फेस येतो? मग सावधान… या रोगांचे आहेत संकेत, जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!

| Updated on: Jun 13, 2022 | 4:29 PM

कुठलाही आजार आणि औषधांच्या सेवनांमुळे बऱ्याच वेळा लघवीत फेसही येतो. मूत्रात जास्त प्रमाणात फेस दिसणे ही देखील एक धोक्याची (Danger) घंटा आहे. यामुळे जर तुम्हाला ही समस्या जास्त प्रमाणात जाणवत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या. किडनीचे मुख्य कार्य म्हणजे रक्तातील प्रथिने फिल्टर करणे. आपल्या शरीरातील द्रव समतोल राखण्यात प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. किडनी खराब झाल्यामुळे किंवा किडनीच्या कोणत्याही आजारामुळे हे प्रोटीन किडनीतून बाहेर पडते आणि लघवीत मिसळते.

तुमच्याही यूरिनमधून फेस येतो? मग सावधान... या रोगांचे आहेत संकेत, जाणून घ्या याबद्दल सविस्तरपणे!
Image Credit source: mstrust.org.uk
Follow us on

मुंबई : यूरिन म्हणजेच लघवी (Urine) करताना अनेकांना समस्या येतात. यूरिन इन्फेक्शनमुळे काही लोक कायमच त्रस्त असतात. मात्र, काही लोकांची कायम समस्या असते की, लघवीमध्ये खूप जास्त फेस येतो. याची नेमकी कारणे काय आहेत, हे आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कधीकधी फेसची (Foam) निर्मिती मूत्रात जास्त प्रमाणात प्रथिने तयार करते. यामुळे हवेच्या संपर्कात आल्यावर फेस बनवतो. कुठलाही आजार आणि औषधांच्या सेवनांमुळे बऱ्याच वेळा लघवीत फेसही येतो. मूत्रात जास्त प्रमाणात फेस दिसणे ही देखील एक धोक्याची (Danger) घंटा आहे. यामुळे जर तुम्हाला ही समस्या वारंवार जाणवत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

गंभीर आजाराचे लक्षण

जर तुमच्या लघवीमध्ये खूप फेस येत असेल आणि त्याच वेळी मुत्राचा रंग देखील खूप जास्त पिवळा असेल तर हे एक गंभीर आजाराचे प्रमुख लक्षण आहे. जर हे एखाद्या वेळी झाले तर ठिक आहे पण ही समस्या सतत होत असेल तर आपण डाॅक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरते.

हे सुद्धा वाचा

डिहायड्रेशन

जेव्हा एखाद्या व्यक्तीला डिहायड्रेशन होते. तेव्हा त्याच्या लघवीचा रंग खूप गडद दिसतो. हे अत्यंत कमी प्रमाणात पाण्याच्या वापरामुळे होते. पाण्याचे सेवन कमी केल्याने, प्रथिने मूत्र पातळ होत नाहीत. ज्यामुळे लघवी करताना फेस येतो. यामुळे शक्यतो जास्त पाणी प्या आणि डिहायड्रेशनची समस्या टाळा.

किडनीचे आजार

किडनीचे मुख्य कार्य म्हणजे रक्तातील प्रथिने फिल्टर करणे. आपल्या शरीरातील द्रव समतोल राखण्यात प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. किडनी खराब झाल्यामुळे किंवा किडनीच्या कोणत्याही आजारामुळे हे प्रोटीन किडनीतून बाहेर पडते आणि लघवीत मिसळते. यामुळे लघवीमधून फेस जास्त प्रमाणात येतो.

मधुमेह

मधुमेहामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने किडनीमध्ये अल्ब्युमिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लघवीला फेस येतो. ही लक्षणे टाईप 2 मधुमेहाची सर्व लक्षणे आहेत. अशावेळी आपण योग्य वेळी चेकअप करून घेणे फायदेशीर ठरते.

लघवीमध्ये फेस दिसल्यास काय करावे

लघवीमध्ये सतत फेस येण्याची समस्या निर्माण झाली असेल तर सर्वात अगोदर आपण डाॅक्टरांशी संपर्क साधावा. तुमची लघवीची तपासणी करून घ्या. ज्यामध्ये तुमच्या लघवीमध्ये प्रथिनांचे प्रमाण समजले जाईल. याशिवाय डॉक्टर लघवीमध्ये असलेल्या प्रोटीनची तुलना क्रिएटिनिनशी करतात. लघवीमध्ये क्रिएटिनिनपेक्षा जास्त प्रथिने असणे हे मूत्रपिंडाचा आजार दर्शवते. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.